इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे मार्च २०२५ पर्यंत चालणाऱ्या रण महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव एक अविस्मरणीय असेल ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :
कच्छ तुम्हा सगळ्यांची वाट पाहत आहे! चला, सध्या सुरू असलेल्या रण महोत्सवात, प्राचीन पांढरे रण, कच्छची नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेऊ या. मार्च २०२५ पर्यंत चालणारा हा महोत्सव तुमच्यासह तुमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय अनुभवाची अनुभुती देणारा असेल.