नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे.
या सामन्यासाठी आजच महाराष्ट्र क्रिकेट संघ नाशिक मध्ये दाखल होत आहे. या एकूण १६ जणांच्या यादीत नाशिक चे ३ खेळाडू समाविष्ट आहेत.
महाराष्ट्र संघातील १६ खेळाडू पुढीलप्रमाणे :
१-ऋतुराज गायकवाड – कर्णधार
२- सिद्धेश वीर
३ -पवन शाह
४- यश क्षीरसागर
५- सिद्धार्थ म्हात्रे
६- सौरभ नवले — यष्टीरक्षक
७- रामकृष्ण घोष
८- हितेश वाळूंज
९- प्रशांत सोळंकी
१०- रजनीश गुरबानी
११- प्रदीप दाढे
१२- मुकेश चौधरी
१३ -मुर्तुझा ट्रंकवाला
१४- सत्यजित बच्छाव
१५- धनराज शिंदे – यष्टीरक्षक
व १६- सनी पंडित
संघ उद्या सकाळी सराव करणार आहे.