इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक मध्ये २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे. आठवड्यावर आलेल्या या सामन्याच्या तयारीने आता चांगलाच वेग घेतला आहे.
या सामन्याच्या खेळपट्टीच्या तयारी साठी बीसीसीआय तर्फे त्रयस्थ खेळपट्टी तज्ञ – पीच क्युरेटर – अभिजित पिपरोडे हे नाशिक मध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा सामन्यासाठीची खेळपट्टी तयार करावयास घेतली आहे. खेळपट्टी व्यतिरिक्त इतर बाह्य मैदानाची – आउटफिल्डची – हि पाहणी केली. त्यांनी हिरवेगार मैदान पाहून समाधान व्यक्त केले आणि त्या अनुषंगाने येथील स्थानिक ग्राउंडस्मनना आवश्यक ते मोलाचे मार्गदर्शन केले.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील या भेटीच्या वेळी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान चेअरमन धनपाल ( विनोद ) शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांनी त्यांचे स्वागत केले व समवेत पाहणी केली. याप्रसंगी सी इ ओ रतन कुयटे देखील उपस्थित होते.
याबरोबरच मैदानावरील सीमारेषे पलीकडील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचची इतर तयारी देखील जोरात सुरु आहे. क्रिकेट रसिकांसाठी मंडप उभारणी जवळपास पूर्ण होत आली आहे, यामुळे सर्वांना हिरवळीवर बसून सामन्याचा आनंद घेता येणार आहे.