इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची मला ऑफर मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी केल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला ५-१० कोटींपासून ५० कोटींची ऑफर दिली होती असेही त्यांनी सांगितले आहे.
रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरुन अनेक खळबबळजनक दावे केले होते. मात्र आता त्यांनी वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरबद्दल दावा केला आहे. हा दावा करतांना त्यांनी सांगितले की ही ऑफर आल्यानंतर मी सांगितले की हे पाप माझ्याकडून होणार नाही. १० कोटी, २० कोटी ५० कोटी अशी वनटाईम ऑफर दिली जाते. त्यांना माहित होते हा माणूस करु शकतो. याच्यामध्ये दम आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही. नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील.
पोलिसांची चार लोकांची टीम आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याची गुप्त बैठक होते. बैठकीत विचार केला जातो. त्यानंत पाच -सहा जणांची दुसरी विश्वासू लोकांची टीम निवडली जाते. ती घटनास्थळी जाते. जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील. एक अधिकारी, दोन अंमलदार, हवालदार अशी टीम असते. या सगळ्यांना ५ कोटी, १० कोटी रुपयांची लम्पसम ऑफर दिली जाते. चौकशी झाली तर आमचं सरकार आहे. आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करु, असे पोलिसांना सांगितले जाते. अशाप्रकारे बोगस एन्काऊंटर होतो असेही रणजीत कासले यांनी सांगितले.