नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे.
या सामन्यासाठी कालच बडोदा क्रिकेट संघ नाशिक मध्ये दाखल झाला आहे. आज कर्णधार कृणाल पंड्या समवेत संघ सहकाऱ्यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जवळजवळ तीन तास कसून सराव केला. महाराष्ट्र क्रिकेट संघ आज संध्याकाळी नाशिक मध्ये दाखल होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघातील नाशिकचे खेळाडू डावखुरा फिरकी पटू व अष्टपैलू सत्यजित बच्छाव व सलामीचा फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला यांनी देखील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व प्रकारच्या गोलंदाजांबरोबर २/३ तास कसून सराव केला.
दरम्यान हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील खेळाडूंच्या तंबू जवळील मांडवाचे काम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. दोन्ही संघ उद्या सराव करणार आहेत.