अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गुरुपौर्णिमा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामात गुरुच महत्व अधिक असते. मग ते कलेचे असो की शिक्षणाचे गुरु विना ज्ञान नाही. हे ही तितकेच महत्वाचे असते.मालेगाव शहरातील साई आर्टचे रांगोळी शिक्षक प्रमोद आर्वी गेल्या अनेक वर्षा पासून रांगोळीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या ज्वलंत विषयावर,धार्मिक,सामाजिक विषयांवर रांगोळी साकारत असतात त्यासाठी त्यांच्याकडे अनेक विद्यार्थी रांगोळी शिकण्यासाठी येत असतात .गुरुपौर्णिच्या निमित्ताने त्यांच्यासह त्यांच्याकडे रांगोळी शिकणा-या विद्यार्थ्यांनी गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा ही थिम घेत भगवान शंकराचे मनोहक तांडव नृत्य करतांनाचे अप्रतिम भाव रांगोळीच्या माध्यमातून साकारत स्वतला सिध्द करण्यासाठी महादेवाच्या चरणी भेट अर्पण केल्याच साई आर्टचे शिक्षक प्रमोद आर्वी यांनी सांगितले. सहा तासात 6 x 8 आकारात सलग ५६ तासात ही रांगोळी साकरली.