मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप नेत्या खासदार नवनीत कौर-राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. राणा दाम्पत्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याची आजची रात्र तुरुंगातच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राणा दाम्पत्य विशेष चर्चेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यांना याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र, पोलिसांना गुंगारा देत राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले. ते खार परिसरातील घरात होते. राणा यांच्या कृतीला विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत असल्याने आणि धर्म, वंश, भाषा या आधारे सामाजिक तेढ निर्माण करणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी आरोपाअंतर्गत कलम १५३ अ राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1517861272964202499?s=20&t=-rQWq_mCfCVXk7nJtQigOg
राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सेना खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्याला अटक केल्याने भाजप नेते संतप्त झाले आहेत. राज्यात लोकशाही नाही तर हुकुमशाही सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1517853281577766912?s=20&t=-rQWq_mCfCVXk7nJtQigOg