मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज तो स्वीकारला आहे. तसेच, त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या महिन्यात पत्र लिहिले होते. तशी माहिती खुद्द कोश्यारी यांनीच दिली होती. कोश्यारी हे त्यांच्या विविध विधाने आणि वादग्रस्त वक्तव्यांवरुन नेहमीच चर्चेत राहिले. तसेच, त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे यासाठी विरोधकांनी जोरदार मागणी आणि आंदोलनही केले होते.
कोश्यारी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/maha_governor/status/1617466688286650368?s=20&t=Z0sotfwkOj1XQQSvs64bkw
वादग्रस्त व्यक्तिमत्व
कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून विविध महान व्यक्तींबाबत नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये केली. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांचे निर्णय हे लोकशाहीला घातक असल्याची टीका वारंवार झाली. राज्य मंत्रिमंडळाने त्यांना सादर केलेली आमदारांची यादी न स्विकारण्यापासून विधानसभा अध्यक्षाची निवड करण्याबाबत त्यांचे निर्णय अतिशय वादग्रस्त ठरले.
https://twitter.com/Marathi_Rash/status/1624636537421058049?s=20&t=m1hEVOaKAIeL33t_cyqF0Q
Ramesh Bais is Appointed as a Maharashtra Governor