इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मुस्लिम समाजासंदर्भात योगगुरू बाबा रामदेव यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोळही उठली आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये बोलताना त्यांचा जीभेवरील ताबा सुटला. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. बाबा रामदेव यांच्यावर याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
काय म्हणाले रामदेवबाबा
मुस्लिम दहशतवादी असला तरी तो नमाज नक्कीच अदा करतो. अशा लोकांना इस्लामचा अर्थ फक्त नमाजपर्यंतच समजतो. पाच वेळा नमाज पठण करा आणि तुम्हाला जे काही पाप करायचे आहे ते करा. तुम्ही हिंदूंच्या मुली उचला, किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी व्हा, तुमच्या मनात येईल ते करू शकता मात्र असे हिंदू धर्मात नसते असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. ख्रिश्चन धर्माबाबतही बाबा रामदेव म्हणाले होते की, चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावणे हे ख्रिस्ती धर्माचे तत्त्व आहे. येशू ख्रिस्तासमोर उभे राहा, सर्व पापे नष्ट होतील. ख्रिश्चन क्रॉसचे चिन्ह घालतात. अशीच काही वेशभूषा तयार करण्यात आली आहे. मी कोणावर टीका करत नाही, पण जनता या सगळ्या गोष्टींमध्ये अडकली आहेत. काहींच्या मते सगळ्या जगाला इस्लाममध्ये बदलतील. तर काहीजण म्हणतात की संपूर्ण जग ख्रिश्चन होईल असे वक्तव्यही त्यांनी केले होते.
स्वर्ग नरकापेक्ष वाईट
रामदेव म्हणाले की, या लोकांच्या म्हणजेच मुस्लिमांनुसार स्वर्ग म्हणजे पायजामा घालणे नव्हे. तुमच्या मिशा कापून घ्या. लांब दाढी वाढवा. फक्त टोपी घाला. असं इस्लाम सांगतो किंवा कुराण म्हणतो हेच मी म्हणत नाही, तर हे लोक हे करत आहेत. त्यांना जन्नत मिळावी म्हणून ते करत आहेत. मात्र स्वर्ग नरकापेक्षा वाईट असल्याचेही ते म्हणाले. यावेळी हिंदू धर्मावरही त्यांनी भाष्य केले. सनातन हिंदू परंपरेतील शिकवणीचा त्यांनी उल्लेख केला.
https://twitter.com/TarannumBano_/status/1621386181127847936?s=20&t=n16gO3fCTAICTVXw19SSOA
Ramdev Baba Controversial Statement Again Video Viral