नाशिक – नाशिकची घटना दुर्दैवी असून राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. विरारची घटनाही धक्कादायक असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी ते राज्यातील परिस्थिती जास्त खराब आहे. राज्यातील मंत्र्यांनी विनाकारण केंद्रावर आरोप करण्यापेक्षा राज्यातील रुग्णांना कसा दिलासा देता येईल यासाठी प्रयत्न करावा. राज्यसरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. राज्यसरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य नियोजन केले नाही. केंद्राचे हातपाय पडण्याची गरज नाही, नियोजन करा, लोकांना दिलासा द्या. केंद्र सरकारही उपाययोजना करतेय असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी दुर्घटनास्थळाची केली पाहणी केली. त्यानंतर संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या घटनांची चौकशी करा,दोषींना शासन करा असेही सांगितले. मृतांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत मिळावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.