नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाणे अयोग्य असल्याचे मत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. ते म्हणाले की, आंबेडकरी चळवळ औरंगजेबाला पाठींबा देणारी नाही. राज्यात कुठेही दंगली झाल्या नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरत म्हणतात की, दंगा थांबला, पण दंगा झालाच नव्हता असेही आठवले यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिले. यावेळी BRS बाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केले. राज्यात या पक्षाचा फारसा फरक पडणार नाही. तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात त्यांना सुद्धा दर्शनाला यायचा अधिकार आहे. मंदिरात पावित्र्य राखले जाते, नॉन व्हेज खाणे चुकीचे आहे. खायचे असेल तर त्यांनी तेलंगणा मध्ये जाऊन मटण खावं , दर्शनाआधी मटण खाणे, हा विठ्ठलाचा अपमान. लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका अधिकार आहे. तो त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे बी टीम आहे, असं म्हणता येणार नाही..
यावेळी विरोधकांच्या बैठकीवरही त्यांनी निशाणा साधला, पंतप्रधानांनी इजिप्त येथे भेट दिली, त्यामुळे नरेंद्र मोदी हे मुस्लिम विरोधी नाही, अशी भावना तयार झाली आहे. नरेंद्र मोदी जगातील एक नंबरचे पॉप्युलर नेते. विरोधकांनी कितीही कांगावा केला, तरी NDA चे सरकार येईल.आम्ही ३५० पेक्षा जास्त जागा जिंकू अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपचे मित्र पक्ष नाराज असल्याच्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, मित्रपक्षाला सोबत घेऊन भाजपा जात आहे.. NDA च्या प्रत्येक मीटिंगला आम्ही जातो. महाराष्ट्रात अशा मीटिंग होत नाही. मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला जागा मिळावी, मित्र पक्षाला जागा मिळावी. स्थानिक पातळीवर भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी बोलवलं पाहिजे. दलित पँथरला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ते म्हणाले की, सुवर्ण महोत्सव १० तारखेला नाशिकमध्ये होईल. अनेक लोकांचे मत आहे की, दलित पँथर संघटन पुन्हा सुरू व्हावे. याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ. यावेळी त्यांनी मॉब लिंचींग, रिपाई शहराध्यक्ष गोळीबार, यावरही आपले मत व्यक्त केले.