सोमवार, नोव्हेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रामायण यात्रा भाग ३… हे आहे सीतेचे जन्मस्थान… अशी आहे सद्यस्थिती… एकदा अवश्य भेट द्या

एप्रिल 24, 2023 | 5:06 am
in इतर
0
EWnWASlUwAECYDW

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा भाग ३
सीतेचे जन्मस्थान – सितामढी 

बिहार मध्ये सितामढी गावापासून ५ किमी अंतरावर पुनौरा धाम किंवा जानकी कुंड नावाचे ठिकाण आहे या ठिकाणी सीतेचा जन्म झाला होता असे सांगितले जाते. त्रेता युगात एकदा जनक राजाच्या मिथिला नगरीत सलग १२ वर्षे पाऊस न पडल्याने मोठा भीषण दुष्काळ पडला. तेव्हा पर्जन्याची देवता असलेल्या इंद्राला प्रसन्न करण्यासाठी खुद्द जनक राजाला आपल्या राज्याच्या भूमीत नांगर चालविण्याचा सल्ला राजगुरुंनी दिला. त्याप्रमाणे हल्लीच्या सीतामढ़ी जवळ पुनौरा नावाच्या ठिकाणी जनक राजाने जमीन नांगारली. जनकराजा जमीन नांगरीत असतांना त्याला जमिनीत एका मातीच्या पात्रात नवजात कन्या मिळाली हीच सीता देवी.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

जनक राजाला जमीन नांगरताना मातीच्या पात्रात लहान बालिका मिळाल्या मुळे या भागाचे नाव प्रथम ‘सीता मढई’, नंतर ‘सीता मही’ आणि कालांतराने ‘सितामढी’ असे झाले.नांगराच्या फाळाला सित म्हणतात आणि मातीच्या पात्राला मढई म्हणतात त्यावरून हे नाव दिले असावे. ज्या ठिकाणी जमीन नांगरित असतांना जनक राजाला सीता मिलाली त्याच जागेवर सीतेच्या विवाहानंतर जनक राजाने एक मंदिर बांधले आणि त्यात श्रीराम आणि जानकी यांच्या प्रतिमांची स्थापना केली अशी लोककथा आहे. त्यानंतर अनेक वर्षांनी या प्रदेशावर घनदाट जंगल उगवले.

अनेक शतके हा भाग दाट अरण्यात अज्ञात राहिला. सुमारे ५०० वर्षांपूर्वी अयोध्येतील एक संत बीरबलदास यांनी दैवी शक्तीच्या जोरावर हे स्थान व येथील सीता राम प्रतिमा शोधून त्यांची पुनर्स्थापना केली आणि त्यांची नियमित पूजा अर्चा सुरु झाली.
प्राचीनकाळी सीतामढ़ी तिरहुतचा भाग होता.मुस्लिम शासक येइपर्यंत मिथिलेच्या कर्नाट वंशाच्या लोकांचे राज्य येथे होते. इंग्रज भारतात आल्यावर हा भाग प्रथम बंगाल आणि नंतर बिहार राज्यात गेला. इ.स. १९०८ मध्ये तिरहुतचा मुजफ्फरपुर जिल्ह्यात समावेश करण्यात आला.

स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ११ डिसेंबर १९७२ रोजी सितामढी हा स्वतंत्र जिल्हा झाला. वृहद विष्णु पुराणा नुसार ज्या ठिकाणी जनक राजाने पाउस पाडण्यासाठी ‘हल -कर्षण-यज्ञ’ करुन जमीन नांगरली तेच सीतेचे अवतीर्ण होण्याचे ठिकाण आहे.सध्या या ठिकाणी उर्विजाकुंड नावाचा अतिशय विशाल तलाव आहे. जनक राजाच्या मिथिला राज्याच्या जनकपुर या राजनगरापासून पश्चिमेला ३ योजन म्हणजे 24 मैल अंतरावर हे ठिकाण आहे. सितामढी तसेच पुनौरा भागात रामायण काळात आणि त्यानंतरही हजारो वर्षे घनदाट अरण्य होते. प्राचीनकाली या परिसरांत पुंडरिक ऋषिचा आश्रम होता. त्यावेळी या भागाला पुण्यअरण्य असे नाव होते.त्याचे पुढे पुण्यरसा,पुण्य उर्विज आणि आता पुनौरा धाम असे नामांतर झाले आहे.

जानकी जन्मस्थली या मंदिराच्या महंतांचे प्रथम पूर्वज सिद्ध पुरुष होते.त्यांनीच वृहद विष्णु पुराणातील वर्णना नुसार नेपाळ मधील जनकपुर पासून पुनौराधाम पर्यंतचे अंतर प्रत्यक्ष मोजून या स्थानाचा शोध लावला आणि हीच राजा जनकाची ‘हल-कर्षण-भूमी’ असल्याचे सिद्ध केले.याच ठिकाणी लक्ष्मणा नदीच्या काठावर एक वृक्षा खाली बसून त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली.पुढे येथे त्यांचा मठ उभारण्यात आला.गुरुपरंपरे नुसार हा मठ आजही येथे आहे. सितामढी येथे ‘उर्विजा जानकी’ या नावाने दरवर्षी श्रीराम नवमी आणि विवाह पंचमी या दोन प्रसंगी मोठे उत्सव साजरे केले जातात.यावेळी आशिया खंडातील सर्वांत मोठ्या जनावरांच्या मेळाव्याचे आयोजन केले जाते.

सितामढी येथील प्रमुख आकर्षण
जानकी जन्म स्थान मंदिर
सीतामढ़ी हे जानकीचे जन्मस्थान म्हणून रामायण कालपासून प्रसिद्ध आहे. सितामढी रेल्वे स्टेशन पासून दिड किमी अंतरावर जानकी जन्मस्थान मंदिर आहे.
मंदिराचा परिसर अतिशय भव्य आणि सुशोभित आहे. मंदिर देखील विशाल आणि मनमोहक आहे. मंदिरांत सर्वत्र रामायणातील प्रसंग चित्रित केलेले आहेत.मंदिरांत श्रीराम,सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत.
अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मंदिरा प्रमाणेच सितामढी जवळलचे पुनौरा धाम येथील श्रीजानकी माता जन्मस्थान मंदिर प्रत्येक हिंदू भाविकांना वन्दनीय आहे.

https://twitter.com/TourismBiharGov/status/1647162855152660480?s=20

उर्विजा कुंड तलाव
मंदिर परिसरात शंभर सव्वाशे फुट अंतरावर उर्विजा कुंड या नावाचा एक मोठा तलाव आहे. तलावा भोवती भरपूर झाड़ी लावण्यात आली आहेत.तलावा भोवती पायी फिरण्यासाठी वाकिंग वे बांधलेला आहे. निसर्गरम्य वातावरण आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळे यांमंदिरात आल्यावर मनाला मानसिक शांततेचा अनुभव येतो.

उर्विजा तलावाच्या जवळ आणखी एक मोठे मंदिर आहे. हे मंदिर खूप मोठे आणि शोभिवंत आहे.येथे राजा जनक,त्याची पत्नी सुनयना लहानगी सीता, उर्मिला आणि इतर लहान मुलं आहेत. या दोन्ही मंदिराशिवाय अनेक लहान मोठी मंदिरं आहेत.
सितामढी परिसरांत पुनौरा धाम आणि जानकी कुंड, हलेश्वर महादेव मंदिर,पंथ पाकड़,बगही मठ देवकुली इत्यादि अनेक प्रेक्षणीय ठिकाण आहेत.

-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Sita Birthplace Sitamadhi by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंढरपूरच्या शेतकऱ्याची कमाल… रेशीम शेतीतून मिळवला रोजगार…. अशी आहे त्यांची जबरस्त यशोगाथा

Next Post

उन्हाळी सुटीत मुलांना स्विमिंग क्लास लावायचाय? अशा आहेत बॅचेस… नाशिक मनपाची सज्जता

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
nashik swimming pool

उन्हाळी सुटीत मुलांना स्विमिंग क्लास लावायचाय? अशा आहेत बॅचेस... नाशिक मनपाची सज्जता

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011