शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रामायण यात्रा दर्शन भाग -९ : ऋषी-मुनींच्या अस्थिंचा सिद्धापर्वत…. राम वन मंदिर…. एकदा अवश्य भेट द्या

by Gautam Sancheti
एप्रिल 30, 2023 | 5:28 am
in इतर
0

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -९) 

ऋषी-मुनींच्या अस्थिंचा सिद्धापर्वत
|| राम वन मंदिर, सतना ||

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाने आपल्या चौदा वर्षांच्या वनवास काळातील साडे अकरा वर्षे चित्रकूट आणि आसपासच्या प्रदेशांत व्यतीत केला असा स्पष्ट उल्लेख रामायणात केलेला आहे.वनवासाच्या या दीर्घ कालावधीत माता सीता आणि लक्ष्मण यांच्या सह भगवान श्रीराम हल्ली उत्तर प्रदेश मधील चित्रकूट आणि त्याला लागूनच असलेल्या मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील जंगल परिसरातील दरया खोर्याँमध्ये राहिले कंद मूळं खावुन त्यांनी त्यावेळी या परिसरांत त्रास देणार्या असुरांचा वध करुन ऋषी-मुनींचे रक्षण केले.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

चित्रकूट क्षेत्रातील सिद्धा पर्वतावर ऋषी-मुनी यांच्या अस्थिंचे मोठ मोठे ढिग पाहून श्रीरामानेआपले बाहू उंचावून ही भूमी निशाचर विरहित करण्याची प्रतिज्ञा याच भूमीवर केली होती. पावनसलिला मंदाकिनीच्या तटावरील याच चित्रकूट येथे कामदगिरी पर्वत आणि भगवान कामतानाथ या सोबतच हनुमान धारा, गुप्तगोदावरी, सती अनसूया आश्रम,स्फटिक शिला, पर्णकुटी ,सीता रसोई या सारखी भगवान श्रीराम आणि सीता माता व लक्ष्मण यांच्या स्मृतींना उजाळा देणारी असंख्य स्थानं आहेत.याशिवाय सुतीक्ष्ण आश्रम, सरभंगा आश्रम या स्थानांचे रामायण काळातील महत्वही उल्लेखनीय आहे.

उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांत पसरलेल्या चित्रकूटला दरमहा लाखो भाविक भेट देतात. चित्रकूट येथे मंदाकिनी नदीच्या स्नानासाठी दर अमावस्येला जणू महामेळा भरतो.चित्रकूट येथील मठांत आणि मंदिरांत वर्षभर भाविकांची गर्दी असते. धार्मिक आणि पौराणिक महत्वासोबतच निसर्गसौदर्य आणि विपुल प्रमाणात खनिज संपत्तीअसलेल्या चित्रकूट येथे पर्यटन विकासाच्या अमर्याद संधी\आहेत. हे ओळखून उत्तरप्रदेश सरकारने चित्रकूटची ब्रॅन्डिंग अगदी योग्य प्रकारे केली आहे. यूपी सरकारने चित्रकूटला जिल्ह्याचा दर्जा दिल्यामुळे ‘चित्रकूट’हा फक्त यूपीचाच भाग असल्याचा समज देशभरातील भाविक आणि पर्यटकांत पसरलेला आहे. मात्र चित्रकूटचा ८० टक्के भाग मध्यप्रदेशांत असुनही मध्य प्रदेश सरकारने मात्र या दुर्लभ संधीचा म्हणावा तसा उपयोग करून घेतलेला नाही.

रामचरितमानस च्या अरण्यकाण्ड या भागामध्ये भगवान श्रीराम जेंव्हा चित्रकूटहून पुढे निघाले तेंव्हा ते सिद्धा नावाच्या पहाडावर पोहोचले. हा संपूर्णपहाड मानवी अस्थिंनी बनलेला होता. त्यावेळी तेथे असलेल्या ऋषी-मुनींनी श्रीरामाला सांगितले, ” श्रीरामा येथील राक्षसांनी हजारो साधु,संत, आणि ऋषी-मुनींना खावुन टाकलं आहे. त्यांच्याच अस्थींचे हे ढिग आहेत.” त्यावेळी क्रुद्ध झालेल्या श्रीरामाने ही भूमी राक्षस विहीन करण्याची घोर प्रतिज्ञा केली होती. हा सगळा भाग मध्य प्रदेशातील हल्लीच्या सतना जिल्ह्यात मोडतो.

या शहराला सतना हे नाव सतना नावाच्या नदीवरून मिळाले.पन्ना जिल्ह्यातील सारंगपूर गावाजवळ असलेल्या सारंग किंवा सुतीक्षण आश्रम येथे या नदीचा उगम होतो. पूर्वी या नगराचे नाव रघुराज नगर आणि इथल्या रेल्वे स्टेशनचे नाव सुतना असे होते.पुढे कालांतराने या शहराचेही नाव सतना असे पड़ले.

यूपी मधील चित्रकूट आणि मध्य प्रदेशातील सतना या दोन्ही जिल्ह्यांत रामायणातील अनेक महत्वाचे प्रसंग घडले आहेत. मुख्य म्हणजे श्रीराम,सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासातील साडे अकरा वर्षे या भागात निवास केल्यामुळे चित्रकूट,पन्ना,बधवारा(कटनी), रामघाट (जबलपुर), राम , मंदिर तलाव,राम नगर मंडला, शहडौल, डिंडोरी आणि अमरकंटक या सर्व परिसरांत ते फिरले होते. श्रीरामाच्या वास्तव्यामुळे हा सर्व परिसर अतिशय पावन पवित्र झालेला आहे.

श्रीराम सर्वप्रथम युपीतील प्रयागराज जिल्ह्यात असलेल्या श्रृंगवेरपुर येथे पोहोचले. प्रयागराज पासून हे ठिकाण सुमारे ४५ किमी अंतरावर आहे.येथे त्यांची निषादराज गुहा यांच्याशी भेट झाली.विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात असतांना निषादराज श्रीराम यांच्या सोबत विद्यार्थी म्हणून शिकत होते. त्यानंतर श्रीरामांनी तमसा नदीच्या किनार्यावर रात्रभर विश्रांती घेतली. हे ठिकाण मध्य प्रदेशांत आहे. याविषयी ‘प्रथम वास तमसा भयो दूसर सुरसरि तीर’ असा तुलसी रामायणात उल्लेख आहे.

रात्रभर येथे विश्रांती घेतल्यावर श्रीराम,सीता आणि लक्ष्मण ४५ किमी वर असलेल्या प्रयागराज येथे गेले. तेथे भरद्वाज ऋषीशी त्यांची भेट झाली. हे ठिकाण यूपीत आहे. येथून प्रभु रामचंद्र मध्य प्रदेशात असलेल्या वाल्मिक ऋषींच्या आश्रमात गेले. वाल्मिक ऋषी भेटल्यावर श्रीराम त्यांना म्हणाले, ” तुम त्रिकालदर्शी मुनिनाथा ,विस्व बदर जिमि तुमरे हाथा!”

यानंतर सध्या मध्य प्रदेशांत असलेल्या सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथे श्रीराम पोहचले.चित्रकूट येथेच महाराज भरत अयोध्येतील प्रजाजन आणि सीतेचे पिता महाराज जनक यांचे सह भगवान श्रीरामांना भेटले. श्रीरामांनी त्या सर्वांची समजूत काढून त्यांना परत पाठविले. त्यानंतर सुमारे साडे अकरा वर्षे याच भूमीत राहून श्रीरामांनी असंख्य राक्षस निशाचर आणि असुरांचा संहार करून ऋषी-मुनी,साधू-संत यांना संरक्षण दिले. या परिसरांत शांतता प्रस्थापित झाल्यानंतर श्रीराम,सीता आणि लक्ष्मण पंचवटी कड़े गेले असे वर्णन रामायणात केलेले आहे.
सध्या मध्यप्रदेशातील सतना येथे रामवन नावाचे धार्मिक स्थळ प्रेक्षणीय स्वरूपात विकसित करण्यात आले आहे. येथे तुलसी संग्रहालय,तुलसी पुस्तकालय, हनुमान मंदिर, भगवान शिव परिवार,रामचरितमानस चावीइत्यादि ठिकाण पाहता येतात.

सतना हे मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पौराणिक स्थान आहे.सतना रिवा मार्गावर सतना पासून २० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. येथे झालेल्या उत्खाननात अनेक प्राचीन मंदिरांचे अवशेष येथे सापडले आहेत. येथे खूप मोठे उद्यान अतिशय चांगल्या प्रकारे विकसित करण्यात आले आहे. रामवन परिसरांत तुलसी संग्रहालय असून येथे उत्खननात मिळालेल्या प्राचीन मंदिरातील मूर्ती व इतर वस्तूंचे जतनकरण्यात आले आहे.

सतना शहरा पासून २० किमी अंतरावर रामवन मंदिर हे धार्मिक ठिकाण आहे. येथे आपल्याला भगवान श्रीरामाच्या विविध रुपांतीलदर्शन घेता येते. रामवन मंदिर परिसरांत हनुमानाची एक भव्य मूर्ती असून हे ठिकाण पाहण्यासाठी दूर वरून लोक येतात. सुमारे ६५ एकर जागेवर रामवन मंदिर परिसर विकसित करण्यात आला आहे.

पूर्वीच्या काळी श्रीरामाने बराच काळ या ठिकाणी व्यतीत केला.श्रीरामाच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे येथे रंगीत मुर्तींच्या स्वरुपांत दर्शन घेता येते. वनवास काळातील श्रीरामाची विविध रूपं पाहून मन भारावून जाते. या मूर्ती एवढ्यासजीव वाटतात की कितीही वेळ त्यांच्याकडे पाहिले तरी मनतृप्त होत नाही. येथे आल्यावर मनाला एक प्रकारची शांतता लाभते असा अनेकांचा अनुभव आहे.

रामवन येथे भाविक आणि पर्यटक यांचे साठी निवास आणि भोजनाची व्यवस्था असलेले रेस्ट हाउस आहे. रामावनात आल्यानंतर नावेतुन नदीपार करणार्या श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या सुबक मूर्ती आहेत. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोप,गोपी,गाई वासराना निवारा दिल्याचे दृश्य दिसते.सगळ्या मूर्ती आकर्षक आणि सजीव वाटतात. त्यानंतर येथे शिव परिवारातील भगवान शंकर,माता पार्वती, श्रीगणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती पहायला मिळतात. सर्व प्रतिमा अतिशय सुबक आणि मनमोहक आहेत.

पंचवटी
रामवन मंदिरांत पंचवटी देखील पहायला मिळते. येथील पंचवटीत पांच वडांऐवजी पिंपळ, वड,आवळा, बेल आणि अशा पांच वेगवेगळ्या वृक्षांचा समूह पहायला मिळतो. येथेच श्रीराम आणि सीतामाता झोपडी बनवून राहत होते.
तुलसी संग्रहालय
सतना येथील रामवन मंदिरातील सर्वांत महत्वाचे आकर्षण आहे ते इथले तुलसी संग्रहालय.या संग्रहालयात प्राचीन काळातील अनेक दगडी मूर्ती व इतर वस्तू पहायला मिळतात. तसेच येथे सोन्या-चादीची नाणी,जुनी भांडी ठेवलेले आहेत.इ.स. १९५९ मध्ये या संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे.

रामवन मंदिरातील ३६ फुट उंचीचा हनुमान हे सर्वांत मोठे आकर्षण आहे. १० फुट उंचीच्या चौथर्यावर हा विशाल हनुमान उभा आहे. हनुमानाच्या भोवती रामायणातील सर्व प्रसंग चित्र रुपांत प्रदर्शित करण्यात आले आहेत. धार्मिक पुस्तकांचे एक भव्य वाचनालय देखील येथे उपलब्ध आहे.

रामवन मंदिराची स्थापना आणि विकास बनारस येथील दानशूर व्यापारी शारदा प्रसादजी यांनी केला आहे. रामवन येथे इ.स. १९२९ पासून 12 वर्षे अखंड रामचरितमानस पाठ करण्यात आला तेव्हापासून हे स्थान चर्चेत आले. इ.स. १९३६ मध्ये सेठ शारदा प्रसाद जी यांनी हनुमान मंदिराची स्थापना केली आणि इ.स. १९३९ मध्ये मानस संघ ट्रस्ट स्थापन करुण ६५ एकर जागेवर सर्व प्रथम ३६ फुट उंच हनुमान मूर्ती व त्यानंतर रामवन मंदिराची तसेच इ.स. १९५९ मध्ये तुलसी संग्रहालयाची स्थापना केली.

सतना येथील रामवन मंदिरा प्रमाणेच पन्ना येथील राम जानकी मंदिर, जुगल किशोर मंदिर बलदेवजी मंदिर, गोविंद जी मंदिर, अमरकंटक येथील नर्मदा उगम, श्रीयंत्र मंदिर, पतलेश्वर महादेव, कपिल धारा बधवारा येथील बांधवगड नॅशनल पार्क, शेष शय्या, बांधवगड किल्ला, बनसागरझील, रामघाट, जबलपुर येथील चौसष्ट योगिनी मंदिर, भेडाघाट, योगिनी मंदिर, डिंडौरी येथील वाटर फ़ॉल ही भाविक आणि पर्यटक यांना आकर्षित करणारी ठिकाण आहेत.

कसे जावे?
सतना येथे जाण्यासाठी जवळचे विमानतळ खजुराहो १६०किमी,जबलपूर २२५ किमी. अलाहाबाद २२५ किमी जवळचे रेल्वे स्टेशन सतना २६ किमी, कटनी ७० किमी बस मार्ग. सतना येथील ब्स्मर्ग अतिशय चांगले असून यूपी आणि मध्य प्रदेशातील प्रमुख शहरातून येथे थेट संपर्क केला जातो. सतना येथे निवास व भोजनासाठी होटेल्स उपलब्ध आहेत.

विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Ram Van Mandir Satana by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रख्यात लेखिका सुधा मुर्ती यांचे वक्तव्य तुफान व्हायरल; असं काय म्हणाल्या त्या? बघा हा व्हिडिओ

Next Post

मन की बातची ‘शंभरी’! पंतप्रधान नरेंद्र मोदी साधताय देशवासियांशी संवाद (बघा थेट प्रक्षेपण)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

वर्षा निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्य दूतांनी घेतले गणेशाचे दर्शन 1 1024x683 1 e1756473423896
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी विविध देशांच्या ३५ महावाणिज्यदूतांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिली एक दिवसाची मुदतवाढ…

ऑगस्ट 29, 2025
crime 13
क्राईम डायरी

चांदवड तालुक्यात २२ वर्षीय तरुणाचा हायवा चालवतांना इलेक्ट्रिक तारेचा धक्का लागल्याने मृत्यू

ऑगस्ट 29, 2025
संग्रहित फोटो
संमिश्र वार्ता

मनोज जरांगे पाटील यांना तातडीने अटक करा, ठाकरेंवरही कारवाई करा…गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांकडे मागणी

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250829 WA0359 1 scaled e1756465385113
स्थानिक बातम्या

अखेर अंबड एमआयडीसीत या संस्थेने रस्त्यावरील खड्डे बुजवले…वाहनधारकांना दिलासा

ऑगस्ट 29, 2025
kanda 11
इतर

भर सभेत अजित पवारांवर कांद्याची मार गरागर फिरवत फेकण्याचा प्रयत्न…दोन जण ताब्यात

ऑगस्ट 29, 2025
accident 11
क्राईम डायरी

दिंडोरीरोडवर भरधाव बुलेटने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत जरांगे पाटील आंदोलनाला बसताच सरकारचा मोठा निर्णय…सुरु आहे या घडामोडी

ऑगस्ट 29, 2025
Next Post
Fu7mYqOXgAA8fBm

मन की बातची 'शंभरी'! पंतप्रधान नरेंद्र मोदी साधताय देशवासियांशी संवाद (बघा थेट प्रक्षेपण)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011