इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -२३)
||रावणाच्या लंकेत भगवान श्रीराम||
रामायणा मध्ये ज्याला लंका अथवा लंकापुरी म्हटल आहे तो प्रदेश म्हणजे आजची श्रीलंका. श्रीलंका हा देश भारताच्या दक्षिणेला फक्त 31 किमी अंतरावर आहे. याच श्रीलंकेत रावणाने सीतेला नेले होते. लंकेतील अशोक वाटिकेत सीता मातेचे वास्तव्य होते. या अशोक वाटिकेविषयी आपण आता जाणून घेऊया…

मो. ९४२२७६५२२७
इ.स. 1972 पर्यंत श्रीलंकेचे नाव सिलोन होते. नंतर हे नाव बदलून ‘लंका’ करण्यात आले आणि 1978 मध्ये याच्यापुढे सन्मान सूचक शब्द ‘श्री’ जोडण्यात आला तेव्हापासून या देशाचे नाव श्रीलंका असे झाले. लहानपणापासून रावणाच्या सोन्याच्या लंके विषयी ऐकलं होतं. एके काळी रेडिओ सिलोन मुळे श्रीलंका संगीतप्रेमी कानसेनाचा जीव की प्राण झाली होती. ‘वाल्मकी रामायण’ हा असा ग्रंथ आहे ज्यात सात हजार वर्षांपूर्वी श्रीलंकेचे सर्व प्रथम सविस्तर वर्णन लिहिले आहे. अशा प्रकारचा लिखित पुरावा जगातल्या इतर कोणत्याही देशाचा नाही.
भारत आणि श्रीलंका यांच्या मध्ये श्रीराम आणि वानरसेना यांच्या दवारे बनविलेला’ रामसेतू’ आज सुध्दा अस्तित्वात आहे. मंदिराच्या अभिलेखा नुसार हा रामसेतू पूर्णपणे सागराच्या’ पाण्यावर स्थित आहे. श्रीलंके मध्ये एकूण नऊ राज्ये आणि 25 जिल्हे आहेत. हिंदी महासागरामध्ये श्रीलंकेचा आकार एखाद्या मोत्याच्या दाण्यासारखा दिसतो यामुळे त्याला हिंदी महासागराचा मोती असेही म्हणतात.
अनुराधापूर हे श्रीलंकेचे प्राचीन शहर आहे. जवळ जवळ चौदाशे वर्षे अनुराधापूर लंकेची राजधानी होती. श्रीलंकेचे क्षेत्रफळ 65,610 चौ. किमी आहे आणि लोकसंख्या आहे दोन कोटी २२ लाख आहे. आपल्या मुंबईची लोकसंख्य दोन कोटी 13 लाख आहे.
कोलंबो हे श्रीलंकेतील सर्वात मोठे शहर आहे. श्रीलंकेतील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोलंबोत आहे. श्री जयवर्धनपुर कोहे, कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो समुद्र किनाऱ्यावर आहे. हे सर्वात मोठे सागरी बंदर आहे. येथून १८० किमी अंतरावर नुवारा एलिया नावाचे ठिकाण आहे जेथे रामायण काळातील महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. रावणाने सीतेला पंचवटीतून पळवून नेल्या नंतर श्रीराम आणि लक्ष्मण यांनी तिला सर्वत्र खूप शोधले. सीतेचा शोध घेत श्रीराम किष्किंधा नगरी पर्यंत आले. तिथे हनुमान व सुग्रीव यांच्या मदतीने त्यांनी वानरसेना एकत्र केली आणि लंकेवर स्वारी करून रावणाच्या सीतेची सुटका करण्याच्या इराद्याने ते सर्व रामेश्वरम पर्यंत आले. हा सगळा कथा भाग आणि श्रीराम वनवासात जेथे जेथे गेले त्या सर्व स्थानांचा परिचय आपण आजवर करून घेतला.
https://twitter.com/IndiaHistorypic/status/1249586476515332103?s=20
रामेश्वरम जवळ पंधरा वीस किमी अंतरावर धनुषकोडी नावाच्या ठिकाणी समुद्र थौडा उधळ असल्याने नल व नील यांच्या मार्गदर्शनाखाली वानरसेनेने रामसेतू ची निर्मिती केली आणि मग भगवान शंकराची पूजा व आराधना करून श्रीराम व लक्ष्मण यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण वानर सेना रामसेतू वरून थेट रावणाच्या लंकेत जाऊन पोहचली. वाल्मिकी रामायणात वाल्मिक ऋषींनी जे लिहिलय त्या घटना व स्थानांचे अनेक पुरावे आजही श्रीलंकेत पहायला मिळतात. आजही श्रीलंकेत श्रीराम, सीता, हनुमान, लक्ष्मण तसेच मंदोदरी यांच्या संबंधी तीर्थ, गुफा आणि मंदिरं पहायला मिळतात. हिंदू धर्माचा अभ्यास करणारया अनेक संस्था आणि विद्वानांनी लंकेत जाऊन या सर्व स्थानांची शहानिशी केली आहे.
अनेक अभ्यासू आणि इतिहास, तज्ञांनी श्रीलंकेतील पर्वत, दर्या आणि जंगल पिंजून, श्रीलंकेतील नऊ प्रांतांत रामायणा संबंधी अनेक स्थानं शोधून काढली आहेत. त्यातील अनेक श्रीलंकेच्या मध्य प्रांतात आहेत.यात सर्वात महत्त्वाचे आणि मोठे शहर आहे-नुवारा एलिया..
या नगराच्या आसपास अशोक वाटिका रावण गुफा, रावण जलप्रपात, हनुमानाची पावलं. रावण पुत्र मैघनाद याचे तपश्चर्या स्थान आणि राम-रावण युध्दाशी संबंधित अनेक स्थान आहेत.
नुवारा एलिया कोलंबोडून 181 किमी तर कॅन्डी येथून 76 किमी अंतरावर आहे. नुवारा एलिया हे इंग्रजांच्या वेळेपासून श्रीलंकेतील लोकप्रिय हिल स्टेशन आहे. नुवारा एलिया हे तेच ठिकाण आहे ज्याचा रामायणात अशोक वाटिका या नावाने उल्लेख आढळतो. येथेच रावणाने सीतेला लपवून ठेवले होते समुद्र सपाटी पासून 6200 फूट उंचीवर हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथे दक्षिण भारतीय पध्दतीचे ‘सीता अम्मन मंदिर’ किंता सिंहली भाषेत सांगायचे तर ‘सीता एलिया मंदिर’ आहे.
या मंदिरातील मूर्ती 5000 वर्ष पूर्वीच्या असाव्यात असे म्हणतात. या मंदिरात तमिळ भाषेतील राम सीता आणि हनुमान यांची भजन रात्रं-दिवस ऐकायला मिळतात. नुवारा एलिया नावाचा एक पहाड़ आदि ज्याला आजही अशोक वाटिका’ असे म्हणतात. येथे अशौकाचे उंच उंच वृक्ष आहेत. येथील सर्व जंगलच अशोकाच्या अजस्त्र धनवाट वृक्षांनी बहरलेले आहे. या पहाडासमोर सतत वाहनांनी गजबजलेला पक्का पहाडी रस्ता, त्याला लागून असलेले सीतेचे मंदिर आणि या मंदिरा मागे हजारो वर्षापासून अविरतपणे वाहणारा झरा पहाडांत अदृश्य होतो.
https://twitter.com/DipasreeAB/status/1420218373942628352?s=20
अशोक वाटिकेत सीता अकरा महिने राहिली होती. त्यावेळी ती याच अन्याच्या पाण्यात स्नान करीत असे. त्यामुळे या भागाला सीताकुंड म्हणतात. या जलकुंडा जवळच्या पहाडावर दोन पावलांच्या खुणा दिसतात या हनुमानजीच्या पाऊल खुणा आहेत असे म्हणतात. लाल आणि पिवळया रंगाने ही पावलं रंगविली आहेत. बाजूला एका दगडी चबूतर्यावर सीतेची मूर्ती कोरलेली आहे. अशोक वाटिकेत अशोकाच्या वृक्षाखाली बसलेली सीता आणि तिच्या समोर हात जोडून हनुमान उभा आहे अशी ही प्रतिमा आहे.
मंदिर आणि पहाड यांच्यात एक लोखंडी पूल आहे आणि या पुलाखालून अविरत पाण्याचा झरा वाहतो. भारतीय पर्यटक पुलावरून जाताना सीता व हनुमान यांच्या मूर्ती पर्यंत पोहचतात. झर्याचं पाणी भाव भक्तीने तोंडात घेतात मस्तकावर शिंपडतात. काही क्षण अनिमिष नेवांनी हनुमानाच्या पावला कडे बघतात आणि मग अशोक वाटिक कडे नजर वळवतात जेथे आता फक्त धनवाट जंगल आहे.
सगळ्या गोष्टी काळ नष्ट करतो उरतात फक्त आठवणी . मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी खूप माकडे इकडे तिकडे बागडतांना, उड्या मारताना दिसतात मात्र ही माकडे माणसांना त्रास देत नाहीत बरं का.
इथल्या माकडांचे वैशिष्ट्ये म्हणजे इथल्या सगळ्या माकडाच्या शेपटी आपल्याकडच्या माकडाच्या शेपटीपेक्षा लांब असतात असे म्हणतात आणि सर्व माकडांच्या शेपटी काळ्या रंगाच्या दिसतात त्यामुळे ही माकडं हनुमानाची वंशज वाटतात.जगात इतरत्र कुठेही अशा प्रकारची काळया शेपटीची माकडे आढळत नाही असे म्हणतात. रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचा हुकूम दिला तेव्हा हनुमानाने आपली शेपटी लांब केली आणि शेपटीला आग लावल्यावर त्याच शेपटीने रावणाची लंका जाळून टाकली.नंतर हनुमानाने ही शेपटी समुद्रात बुडवून विझविली असे म्हणतात.
इथले लोक म्हणतात रावणाने वाईट काम केले. त्याने सीतेला पळवून आणले आम्ही मात्र विभिषणाला मानतो. त्याची पूजा करतो.
अशोक वनात त्रिजटा नावाची राक्षसी होती. ती सितेशी खूप प्रेमाने वागायची. तिनेच सीतेला धीर दिला. श्रीरामाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या सीतेला तिने सांगितले, मला स्वप्नात एक वानर दिसलंय त्याने सगळी लंका जाळली आणि सर्व राक्षस सेनेचा नाश केला.
सपने बानर लंका जारी | जातुधान सेना सब मारि || येथील पहाडावर काळी आणि सफेद माती दिसते लंका जळाल्याची ही निशाणी आहे काही निशाण्या युगानुयुगे सावध करतात असे म्हणतात.
श्रीलंकेतील सुप्रसिद्ध सीता मंदिरा पासून काही कि.मी. वर देवनारपोल नावाचे एक ठिकाण आहे. या ठिकाणी सितेने आग्निपरीक्षा दिली होती असे म्हणतात. शांत पहाडावर असलेले हे स्थान संरक्षित करण्यात आलं आहे. येथे प्राचीन काळातील काळ्या पत्थरांपासून एक विशाल अग्नीकुंड तयार केलेलं आहे. गोल विहिरी सारखी ही रचना आहे अग्नीकुंडाच्या भिंती उंच आहेत. यानंतर एका उंच पहाडावर विशाल हनुमान मंदिर पहायला मिळते सीतेच्या शोधार्थ हनुमान जेव्हा प्रथमच आले त्यावेळी ते सर्व प्रथम याच पहाड़ावर उतरले असे म्हणतात .येथूनच त्यांनी सीतेच्या शोधाची योजना बनवली होती. या पहाडावर हनुमानाच्या पावलांच्या विशालकाय खुणा उमटलेल्या आहेत त्यावेळी समुद्र पार करताना हनुमानाने विराट रूप धारण केले होते असे म्हणतात.
– विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Part23 Srilanka Ashok Vatika by Vijay Golesar