इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -१४)
सीता हरण आणि जटायुची लढत
|| सर्वतीर्थ टाकेद ||
रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यमधील टाकेदतीर्थ हे होय. येथे पक्षी रूपातील जटायूसुद्धा देवत्व प्रगट करून गेला. इथेच जटायूच्या मृत्यूनंतर श्रीरामांनी त्याचे अंत्यसंस्कार केले व आपल्या पित्याचे व जटायूचे श्राद्ध -तर्पण केले. ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणरेषा आखली होती असे म्हणतात.
नाशिकात गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान हे पंचवटी म्हणून ओळखले जाते. वड, पिंपळ, आवळा, बेल आणि अशोक हे ते पाच वृक्ष आहेत. ह्याच ठिकाणी सीता मातेच्या गुहेजवळ पाच प्राचीन वृक्ष आहेत. ह्या वृक्षांना पंचवट म्हटले जाते. ही झाडे श्रीराम-सीता व लक्ष्मण ह्यांनी स्वत: येथे लावली,असे म्हणतात ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते व श्रीराम-लक्ष्मणाने खर व दूषण ह्या राक्षसांशी युद्ध देखील केले होते. मारिच राक्षसाचा वध पंचवटीच्या जवळच मृगव्याधेश्वर येथे झाला होता. ह्याच ठिकाणी जटायू व श्रीरामांची मैत्री देखील झाली होती. वाल्मिकी रामायणात अरण्यकांडात पंचवटीचे अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे.
सीताहरण आणि जटायू ही कथा रामायणातली एक प्रसिद्ध कथा समजली जाते. सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमाग्रे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला. रावणाने त्याचे पंख कापून टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्रांची वाट पाहत थांबला होता. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्याने रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली. प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले. ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले. रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यमधील टाकेदतीर्थ हे होय. येथे पक्षी रूपातील जटायूसुद्धा देवत्व प्रगट करून गेला. इथेच जटायूच्या मृत्यूनंतर श्रीरामांनी त्याचे अंत्यसंस्कार केले व आपल्या पित्याचे व जटायूचे श्राद्ध -तर्पण केले. ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणरेषा आखली होती असे म्हणतात.
नाशिकवरून इगतपुरी घोटीमार्गे टाकेदचे अंतर ४८ किमी आहे. जटायूमुळे हे टाकेद तीर्थ पावन झाले. नाशिकपासून जवळच असलेले हे ठिकाण. तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे. ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे. त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात. आड-औंढा-पट्टा-बितिंगा या दुर्गम अशा किल्ल्यांनी व्यापलेला हा सारा प्रदेश आहे. इथेच वसले आहे टाकेदतीर्थ. भंडारदरा इथूनसुद्धा हे अंतर ४५ किलोमीटर इतके आहे.
पर्णशाला, भद्राचलम
रावणाने सीतेचे हरण केले या संदर्भात भद्राचलमचे देखील नाव घेतले जाते. पर्णशाला हे ठिकाण आंध्रप्रदेशातील खम्माम जिल्ह्यातील भद्राचलम येथे आहे. हे ठिकाण रामालयहून १ तासाच्या अंतरावर आहे. ह्या ठिकाणाला पनसाला किंवा पर्णशाला असेही म्हणतात. ह्याच ठिकाणी रावणाने सीतामातेला पुष्पक विमानात बसवले होते म्हणूनच ह्या ठिकाणाला सीतामातेचे हरण स्थळ मानतात. याच प्रदेशात राम सीतेचे प्राचीन देऊळ आहे. या मंदिरातील श्रीराम चतुर्भुज आहे. भद्रा ऋषी नावाच्या भक्ताला श्रीरामाने विष्णु रुपांत दर्शन दिले म्हणून हे मंदिर बांधण्यात आले अशी लोककथा या स्थळाविषयी प्रचलित आहे. शिवाय येथे जटायुचे मंदिर किंवा स्थान देखील नाही.
त्यामुळे पंचवटीतुन रावणाने सीतेचे हरण केले आणि टाकेद येथे जटायूने रावणाला विरोध केला. येथेच जटायुने श्रीरामाला सीता हरणाविषयी सांगितले हे जास्त संयुक्तिक वाटते.
सीतेचा शोध (तुंगभद्रा व कावेरी नदीचे क्षेत्र)
सीतेच्या शोधाचे प्रथम स्थान म्हणजे जेथे जटायूचा मृत्यू झाला (सर्वतीर्थ) ते होय. त्यानंतर श्रीराम व लक्ष्मणाने तुंगभद्रा व कावेरी नदीच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी सीतेचा शोध घेतला. तुंगभद्रा ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक प्रमुख नदी आहे. शिमोगा जिल्ह्याच्या कुडली ह्या गावाजवळ तुंगा व भद्रा ह्या नद्यांच्या संगमामधून तुंगभद्रा नदीची निर्मिती होते. येथून ही नदी सुमारे ५३० किमी अंतर वाहता जाऊन तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यांची अंशतः सीमा आखते व कृष्णा नदीला मिळते. हरिहर, हंपी, हॉस्पेट, मंत्रालयम, कुर्नूल ही तुंगभद्रेच्या काठावर वसलेली प्रमुख शहरे आहेत.
हंपी हे आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हंपी हा समानार्थी शब्द – पारंपारिकपणे पंपा-क्षेत्र, किष्किंधा-क्षेत्र किंवा भास्कर-क्षेत्र म्हणून ओळखला जातो- जो हिंदू धर्मशास्त्रातील देवी पार्वतीचे दुसरे नाव, पंपा पासून व्युत्पन्न झाला आहे. हे ठिकाण पम्पाक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे मध्ययुगीन काळातील तीर्थक्षेत्र होते. ते हिंदू महाकाव्य रामायणाच्या किष्किंधा अध्यायांतून प्रसिद्ध झाले, जिथे राम आणि लक्ष्मण अपहरण केलेल्या सीतेच्या शोधात असताना हनुमान, सुग्रीव आणि वानर सेना यांना भेटतात.
महाकाव्यात वर्णन केलेल्या ठिकाणाशी हंपी क्षेत्राचे बरेच जवळचे साम्य आहे. प्रादेशिक परंपरेचा असा विश्वास आहे की रामायणात उल्लेख केलेले हे ठिकाण यात्रेकरूंना आकर्षित करते.१८०० च्या दशकात कर्नल कॉलिन मॅकेन्झी नावाच्या अभियंत्याने हे प्रकाशात आणले होते.
– विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Part14 Sarvatirtha Taked by Vijay Golesar