बुधवार, ऑक्टोबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रामायण यात्रा दर्शन (भाग -११)…  श्रीरामांचा चार महिने निवास… रामटेकची अशी आहे महती…

मे 2, 2023 | 5:24 am
in इतर
0
D2pAQxbWoAEJsHg

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
रामायण यात्रा दर्शन (भाग -११) 

श्रीरामांचा चार महिने निवास
|| रामटेक, नागपूर||

वनवास काळात भगवान श्रीराम माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासमवेत रामटेक येथे चार महिने राहिले होते. याशिवाय, माता सितेने येथे स्वयंपाकघरही बनवले होते, स्वयंपाक केल्यानंतर तिने स्थानिक ऋषींना भोजन दिले होते . या गोष्टीचा उल्लेख पद्मपुराणातही आहे.रामटेक हे आपल्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. “रामटेक” म्हणजे “रामाचा डोंगर”.या डोंगराला ‘सिंदूरगिरी’ किंवा ‘शेंदराचा डोंगर’ व ‘तपोगिरी’ किंवा ‘तपस्या करण्याचा डोंगर’ असेही म्हणतात.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

शहराच्या जवळ सुमारे १०० मीटर उंच टेकाडावर हा अनेक मंदिराचा समूह आहे. टेकाडाची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिकरीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी केली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी; तर इतर काम नंतरचे आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वात उंच भागात असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे.

रामटेक किल्ला!
छोट्या टेकडीवर बांधलेले रामटेक मंदिर गढ मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर कमी तटबंदीचे दिसते. विशेषत: सूरानदी पूर्वेकडे वाहत आहे. रामटेक मंदिर किल्ला म्हणून राजा रघु भोसले यांनी बांधले होते. मंदिराच्या आवारात एक तलाव आहे; या तलावामध्ये पाण्याची पातळी कधीही कमी-जास्त होत नाही.पाण्याची पातळी सदैव समान राहिल्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. एवढेच नव्हे तर जेव्हा जेव्हा विजा चमकतात तेव्हा मंदिराच्या शिखरावर एक दिवा प्रकाशित केला जातो, ज्यामध्ये भगवान रामची प्रतिमा दिसते असे म्हणतात.

अगस्त्य ऋषीं श्रीराम भेट
रामटेक येथे भगवान राम आणि ऋषी अगस्त्य भेटले होते. अगस्त्य ऋषीनी याच ठिकाणी श्रीरामानां शस्त्रांचे ज्ञान आणि ब्रह्मास्त्रही दिले. भगवान श्रीरामने याच ब्रह्मास्त्राने रावणांचा वध केला.
कालिदास यांनी या ठिकाणी मेघदूत लिहिले
महाकवी कालिदास यांनी या ठिकाणी मेघदूत हे महाकाव्य लिहिले आहे. म्हणूनच, या जागेला रामगिरी देखील म्हटले जाते.

मंदिर
राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव पडले. नागपूरपासून ५४ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे. या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो.

इतिहास
रामटेकचा इतिहास मनोरंजक आहे. इ.स.२५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता.सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ.स. ३५० मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झाले असा समज आहे. संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे ‘मेघदूत’. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक गडमंदिर परिसरात, महाराष्ट्र शासनाने ‘कालिदास स्मारकाची’ निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे.या ठिकाणी दरवर्षी ‘कालिदास महोत्सव साजरा होत असतो. जवळच, तोतलाडोह हे धरण आहे. रामटेक मध्ये अनेक लहान लहान तलाव आहेत. रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटक कालीन नगरधनचा किल्ला, त्यांची राजधानी होता.

रामटेक येथील अष्टदशभुज गणपतीची मूर्ती
रामटेक परिसरात पुरातन बौद्ध संस्कृतीचाही शोध लागला आहे. त्या परिसरात उत्खनन चालू आहे. मनसर येथे महाविहार होता असे उत्खननात आढळून आले आहे. ही आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांची कर्मभूमी असल्याचे मानतात. येथे चक्रधरस्वामी यांचे प्राचीन मंदिर आहे . बाराव्या शतकात परिभ्रमण करत असताना भरुच-गुजरात येथून स्वामी रामटेकला आले होते, असा उल्लेख मराठीचा आद्यग्रंथ लीळाचरित्र यामध्ये आला आहे.येथे स्वामीचे दहा महिने वास्तव्य होते.

आख्यायिका
हिरण्यकशिपूरचा नाश केल्यावर नरसिंहाने येथे आपली गदा फेकली व त्यायोगे देवळा जवळ तळे निर्माण झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी एका शूद्राने तपस्या करून मोठे जप जाप्य केले. वरच्या वर्गाच्या या धर्माचरणाच्या शंबूकाने केलेल्या गैरवापरामुळे अनर्थ ओढवला. त्यामुळे रामाने शंबूकाला ठार मारले. अशा प्रकारे प्रत्यक्ष श्रीरामाच्या हातून मरण प्राप्त झाल्यामुळे त्यास अत्यानंद झाला व त्याने रामाकडून रामटेकला कायमचे वास्तव्य करण्याचा वर मागून घेतला. त्यास रामाने अनुमती दिली व शंबूकाचीही येथे पूजा होईल असे सांगितले. त्याप्रमाणे धुमेश्वर महादेवाचे मंदिर येथील शंबूकाच्या मूर्तीची पूजा रामाबरोबरीने होते असे सांगितले जाते.

देऊळवाडा
नागपूरचा रघूजी पहिला याच्या हातून देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम झाले. मुख्य दरवाजा वराह दरवाजा. कारण लगेच आत वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा या रेषेतील दुसरा दरवाजा असून त्यातून आतल्या तटबंदीत प्रवेश मिळतो तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो.

आतमध्ये राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची मंदिरं आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यामागे राम व सीतेचे मोठेमंदिर आहे. मुख्य मंदिरासभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत. नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे य वास्तूत दृग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यांमुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो. शिखरे भूमीज प्रकारची आहेत. मध्यमयुगीन प्रकारचे वास्तुशिल्प येथे दिसते. गोकुळ दरवाजा व लक्ष्मण मंदिरावरील कोरीवकाम खास उल्लेखनीय आहे.

यात्रा व जत्रा
रामटेकला दोन यात्रा भरतात. त्रिपुरी पौर्णिमेला एक व दुसरी रामनवमीच्या वेळेला असते. 12 व्या शतकातही ही यात्रा भरत असे असा उल्लेख लीळा चरित्र ग्रंथात आला आहे.रामाच्या देवळावर त्रिपूर जाळण्याची पद्धत त्रिपुरासुराच्या शिवाने केलेल्या संहाराची निदर्शक आहे. या जत्रेत भांडी, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू विक्रीस असतात. सितामाता रसोई घर गडमंदिर रामटेक :- येथे दर शनिवारी आणि रविवारी उन्हाळ्यात सकाळी ९:३० ते दुपारी १२.३० पर्यंत व इतर ऋतूंमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपावेतो निशुल्लक भोजन देण्यात येते.

-विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Ramayan Yatra Part11 Ramtek Nagpur History by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कामगारांसाठी प्रत्येक तालुक्यात उभारणार या सुविधा; मंत्री सुरेश खाडे यांची घोषणा

Next Post

अभिनेता सलमान खानचे भारताबाबत खळबळजनक वक्तव्य; पुन्हा टीकेला तोंड द्यावे लागणार?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
Next Post
salman khan

अभिनेता सलमान खानचे भारताबाबत खळबळजनक वक्तव्य; पुन्हा टीकेला तोंड द्यावे लागणार?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011