शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऐतिहासिक मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थींनी वसतिगृहाचा असा झाला कायापालट

सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून साकार झाली सुसज्ज, टोलेजंग इमारत...!

जुलै 29, 2021 | 6:16 pm
in इतर
0
IMG 20210729 WA0017

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थीनी वसतिगृहाची सुसज्ज, टोलेजंग इमारत मुलींच्या निवासासाठी सज्ज झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाने उपलब्ध करून दिलेल्या ४ कोटी २९ लाखांच्या निधीतून या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

Suresh Patil
– सुरेश पाटील 
जनसंपर्क अधिकारी, समाज कल्याण विभाग, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी भाऊराव कृष्णराव गायकवाड उर्फ पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळाची १९४१ साली स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थीनी वसतिगृहाचे विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी मग त्यांनी प्रत्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याहस्ते १९५४ मध्ये या वसतिगृहाच्या इमारतीचे भुमिपूजन केले.

प्रत्यक्षात मात्र बांधकाम होवून हे वसतिगृह १ जुलै १९५६ रोजी सुरू झाले. सुरूवातीला ७ मुलींच्या प्रवेशापासून किस्मतबाग येथे भाड्याच्या जागेत हे वसतिगृह सुरू झाले. सुरूवातीला काही वर्ष मुलींच्या भोजनाचा व शालेय साहित्याचा खर्च स्वत: दादासाहेबांनी केला. नंतर मुलींची संख्या वाढत गेली. त्यामुळे दादासाहेबांनी टिळकपथ, शालीमार भागात संस्थेच्या स्वत:च्या जागेत दगडी बांधकाम असलेली इमारत उभारली. सुरूवातीला ७ मुली नंतर २४ मुली, ५० मुली, १०० मुली अशी हळूहळू या वसतिगृहांची क्षमतावाढ होत आजच्या घडीला १८० मुलींना प्रवेश देण्याची क्षमता या वसतिगृहाची आहे.

सन २०१५ पूर्वी वसतिगृहाची इमारत जुन्या पध्दतीत बांधलेली होती. १८० मुली बसतील असे भोजनगृह होते. ८ रूममध्ये मुलींच्या निवासाची सोय होती. त्यामुळे मुलींच्या निवासात मोठी अडचण निर्माण होत असे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्ताने २०१५ मध्ये बाबासाहेबांच्या पावन ‌स्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला. या निर्णयात संस्थेच्या १७६७ चौ.मीटर जागेत मुलींच्या वसतिगृहासाठी इमारत बांधकामांसाठी ४ कोटी २९ लाखांचा निधी मंजूर केला.

प्रत्यक्ष बांधकामास २०१९ मध्ये सुरूवात झाली. २ वर्षात या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तीन मजली इमारतीत मुलींच्या निवासासाठी २० रूम आहेत. प्रत्येक रूममध्ये ८ बेड आहेत. तर कार्यक्रम, उपक्रमांसाठी एक मोठा बहुउद्देशिय हॉल आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गरम पाण्यासाठी सोलर सिस्टीम बसविण्यात आली आहे. स्वयंपाकासाठी सुसज्ज किचन निर्माण करण्यात आले आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा जतन ठेवण्याचं काम त्यांचे पुतणे तथा संस्थेचे सचिव पी.के.गायकवाड,उपाध्यक्ष रमेश गायकवाड, नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, सुधीर गायकवाड, अधीक्षिका बेबीताई डेर्ले गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे करत आहेत.

IMG 20210729 WA0016

वसतीगृहाची जुनी इमारतमहान व्यक्तींच्या भेटी
वसतिगृह इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण बडोद्याचे महाराज फत्तेसिंग गायकवाड यांच्या हस्ते ६ जानेवारी १९६२ रोजी झाले. या वसतिगृहाचे उद्घाटन भारताचे तत्कालीक संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याहस्ते ९ जून १९६३ रोजी झाले. या वसतिगृहाला भारताचे तत्कालीक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, लोकजनशक्ती पाटीचे तत्कालीक अध्यक्ष रामविलास पासवान, रिपब्लीकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, तत्कालीक सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी भेटी दिल्या आहेत.

ऐतिहासिक दस्तावेजांचे जतन
काळाराम मंदिर सत्याग्रहापूर्वी व सत्याग्रहानंतर लंडन येथे वास्तव्यास असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना लिहलेल्या एकूण ८ पत्रांचा संग्रह या वसतिगृहात जतन करून ठेवला आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे खासदार असतांना त्यांनी अनेक विषयावर संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे केली होती. त्यांच्या सुमारे ६०० भाषणाचा संग्रह वसतिगृहात जतन करून ठेवण्यात आला आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवनमानातील महत्त्वपूर्ण घटनांचा सचित्र आढावा घेणारे ‘स्वतंत्र छायाचित्र दालन’ वसतिगृहांला भेट देणाऱ्या नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.

वसतिगृहात प्रवेश
मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृहात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थींनी प्रवेश दिला जातो. अनुसूचित जाती, जमाती, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींनी आरक्षणनुसार वसतिगृहात प्रवेश देण्यात येत असतो. निवास, भोजन, गणवेश आदी सुविधा विद्यार्थीनी मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. सध्या करोना आजाराच्या प्रार्दुभावामुळे वसतिगृह बंद आहे मात्र प्रवेश देण्याची प्रक्रिया चालू आहे. शासनाचे पुढील आदेश प्राप्त झाल्यावर वसतिगृह सुरू करण्यात येतील. अशी माहिती संस्थेचे सचिव पी.के.गायकवाड यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गंगापूर आणि भावली धरणातून विसर्ग सुरू

Next Post

रोहयोच्या माध्यमातून नाशिक विभागातील इतक्या मजूरांच्या हाताला मिळाले काम

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
rojgar

रोहयोच्या माध्यमातून नाशिक विभागातील इतक्या मजूरांच्या हाताला मिळाले काम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011