नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला असून १९ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या निवडणुकीसाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला असून त्यांनी प्रा.राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. आज सकाळी ते १० वाजता अर्ज दाखल करणार आहे.
माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले. या पदासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही होता. पण, भाजपने ही जागाही आपल्याकडे ठेवली आहे.
प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणूक माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्षचंद्रशेखर बावनकुळे व एनडीएचे आणि महायुतीचे आणि सर्व नेते यांचे मी मनापासून आभार मानतो.