कच्छ (गुजरात) – भारतीय संस्कृतीत भूतदयेला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्राणी, पक्ष्यांविषयी प्रत्येकाच्या मनात ममत्व असते. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या मानवीय भावना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येत असतात. मग त्याला कोणतेही निमित्त पुरेसे असते. गुजरातमधील कच्छ भागात राहणार्या एका व्यक्तीने कॅट गार्डन म्हणजेच मांजरींसाठीचे घर तयार करून प्राण्यांविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे.
कॅट गार्डनची स्थापना कच्छ येथील रहिवासी उपेंद्र गोस्वामी यांनी आपल्या दिवंगत बहिणीच्या आठवणीनिमित्त २०१७ मध्ये केली होती. कॅट गार्डन या नावामुळे या घरात २०० हून अधिक मांजरी राहात आहेत. उपेंद्र गोस्वामी कस्टम हाउस एजंट आहेत. त्यांच्या बहिणीचा १९९४ रोजी मृत्यू झाला होता. कॅट गार्डन पाहुण्यांसाठी एक पर्यटन केंद्रच झाले आहे. हे केंद्र दर रविवारी कमीत कमी प्रवेश शुल्क घेऊन चार तास पर्यटकांसाठी खुले असते. ते ५०० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
कॅट हाउसच्या स्थापनेची गोष्ट
गोस्वामी हे जीवनातील यशाचे श्रेय कॅट हाउसलाच देतात. कॅट हाउसच्या स्थापनेबाबत गोस्वामी सांगतात, आम्ही दरवर्षी दिवगंत बहिणीची जयंती साजरी करतो. एकदा एका मांजरीने आमच्या घरात प्रवेश केला आणि बहिण्याच्या वाढदिवसाचा केक खाल्ला. (ही घटना तिच्या निधनानंतरची आहे) तेव्हापासून ती मांजर आमच्यासोबत राहते. मांजरीच्या रूपात आलेली ही आमचीच बहीण आहे, असे आम्ही मानतो. कुटुंबाने तेव्हापासून अनेक मांजरी पाळायला सुरुवात केली. २०१७ रोजी त्यांच्यासाठी कॅट गार्डनची स्थापना केली.
एसी, मिनी थिएटर आणि बरेच काही
बकौल गोस्वामी सांगतात, कॅट हाउसमध्ये वाढलेल्या मांजरींना सर्व सुविधा दिल्या जातात. आमच्याकडे चार वातानुकूलित खोल्यांसह १२ बेडसोबत १६ कॉटेज आहेत. येथे शॉवर आणि मिनी थिएटरही आहेत. सर्व मांजरी सायंकाळी प्राण्यांशी संबंधित कार्यक्रम पाहतात. मांजरींना दिवसातून तीन वेळा जेवण दिले जाते. त्यांना कॅट फूडच्या चांगल्या ब्रँडचे अन्न खाऊ घातले जाते.
मांजरींच्या आरोग्याची काळजी
गोस्वामी सांगतात, कॅट गार्डनमध्ये मांजरीची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. अहमदाबाद येथील जीवदया धर्मादाय न्यासाकडून ही तपासणी केली जाते. मांजरी आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. त्यांची योग्य देखभाल करण्यासाठी आम्ही नेहमची प्रयत्नशील असतो.
मिळकतीच्या ९० टक्के खर्च मांजरींवर
गोस्वामी यांची पत्नी एका शाळेत मुख्याध्यापिका आहेत. कॅट हाउसच्या देखभालीसाठी त्या पतीची मदत करतात. मांजरींच्या घराच्या देखभाल दुरुस्तीसाठी दर महिन्याला लागणारा १.५ लाख रुपयांच्या ९० टक्के खर्च दांपत्य स्वतः उचलतात.