मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेली राज्यसभेची निवडणूक अखेर पार पडली असून त्याचे निकाल ही जाहीर झाले आहेत. राज्यसभेचा महाराष्ट्रातील सहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. परंतु शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातो. या निवडणुकीत महाविकास आघाडीची ९ मते फुटल्यानेच भाजप उमेदवार विजयी झाला आहे.
विशेषतः शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने भाजपने भाजपची भाजपने बाजी मारली असून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यांची खेळी या राजकीय खेळी यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मते मिळाली आहेत. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 32, तर भापजचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 25 मते मिळाली. त्यानंतर संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात आता चुरशीची लढत निर्माण झाली होती. पण, दुसऱ्या पसंतीची मते महाडिक यांना जास्त मिळाल्याने त्यांचा विजय झाला आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य घडले. सुमारे 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची सुमारे 9 मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे.
राज्याच्या वाट्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी (दि. 10) मतदान झाले. या निवडणुकीसाठी राज्यात प्रचंड चुरस पाहायला निर्माण झाली होती. या निवडणुकीत 285 आमदारांनी मतदान केले. परंतु मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आले आहे. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही आपले उमेदवार जिंकण्यासाठी लढविली होती, असे म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेचे नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यानंतर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला गेला. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात सुहास कांदे यांचे मत बाद का झाले याची माहिती दिली आहे. कारण कांदे यांनी बॅलेट पेपर फोल्ड न करता पोलिंग एजेंटकडे नेला. तसेच त्यांनी पकडलेला बॅलेट पेपर बाजूच्या क्युबिकलमधून दिसत होता. बॅलेट पेपर आपल्या नेमून दिलेल्या एजंटला नेमून दिलेल्या जागेच्या बाहेर येऊन दाखवला. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी वारंवार बाजावूनसुद्धा ते खुला बॅलेट पेपर घेऊन हिंडत होते.