मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार आहे. शिवसेनेने दोन उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. त्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. तर, भाजपने त्यांचे तीन उमेदवार रिंगणात आणले आहेत. परिणामी, शिवसेनेचा दुसरा आणि भाजपचा तिसरा उमेदवार यांच्यात जोरदार टश्शन आहे. आज माघारीचा अखेरचा दिवस आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक आज झाली. या बैठकीत भाजपने तिसरा उमेदवार कायम ठेवण्याचा निश्चय केला आहे. विशेष म्हणजे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याचे लॉजिंकही संगितले आहे. बघा, ते काय म्हणताय (व्हिडिओ)
https://twitter.com/ChDadaPatil/status/1532639192043225093?s=20&t=6-SBw2HPUzRMGFNFQb_xWQ