नाशिक – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची बैठक महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे घेण्यात आली. एकुण २२ शासकीय विभाग एकत्रित असलेल्या या संघटनेत प्रत्येक विभागाचा एक पदाधिकारी असावा व सर्व विभागांना न्याय मिळावा या उद्देशाने प्रत्येक विभागास एक पद देण्याचे विश्वास काटकर यांनी जाहीर केले. त्याप्रमाणे प्रत्येक विभागाच्या एका पदाधिका-याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संघटनेचे अध्यक्ष पद महसूल विभागाकडे तर सरचिटणीस पद जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात आलेले आहे. खालीलप्रमाणे राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची नाशिक जिल्हा संघटनेची नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकारिणी-
१) अध्यक्ष – श्री. दिनेश वाघ (महसूल विभाग),
२) सरचिटणीस -श्रीमती सुनंदा जरांडे- (जलसंपदा)
३) कोषाध्यक्ष- श्री. गोविंदा लहामगे (वन विभाग)
४) सहकोषाध्यक्ष – संतोष देवरे (वन विभाग)
५)कार्याध्यक्ष –
– श्रीमती पुजा पवार (शहर) (शासकीय रुग्णालय)
– विनय जाधव-(ग्रामीण)- धर्मदाय आयुक्त कार्यालय
६) उपाध्यक्षपदी –
– श्रीमती अर्चना देवरे (महसुल विभाग)
– श्री. जगदीश घोडके (कोषागार कार्यालय)
– श्री. संजय जाधव-(आदिवासी विकास भवन )
– श्री.प्रशांत रौंदळ- (वस्तु व सेवा कर विभाग)
– श्री.जितेंद्र पालवे- (तंत्रशिक्षण विभाग, सामनगाव )
७) सहसचिव-
– श्री.निलेश गवळी- (प्रादेशिक परिवहन विभाग)
– श्री. मिलिंद जगताप- (भुमी अभिलेख विभाग)
– श्री. गणेश पवार – (शिक्षण विभाग)
– श्री. रविंद्र पवार – तलाठी कार्यालय विभाग)
८) जिल्हा संघटक –
– श्रीमती लता परदेशी-(जिल्हा रुग्णालय)
– श्री.मनोज आहिरे – (माहिती व जनसंपर्क विभाग)
– श्री. अनिल बच्छाव – सहकार विभाग
– श्री मुकेश पाटील - मध्यवर्ती कारागृह विभाग
– डॅा. पंकज वाघ – जिल्हा रुग्णालय
– श्रीमती जीजा गवळी – जलसंपदा विभाग
९) अंतर्गत हिशोब तपासणीस – श्री.राजेंद्र देशमाने- (जिल्हा लेखापरीक्षण-सहकार विभाग )
१०) कार्यालयीन सचिव – श्री. किशोर ठाकुर (औद्योगिक प्रशिक्षण विभाग)
११) संपर्क प्रमुख – श्री. श्यामसुंदर जोशी (औद्योगिक प्रशिक्षण संस्था)
१२) प्रसिद्धी प्रमुख – श्री. दिलीप पाटील (तंत्रज्ञान विभाग)
यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करताना संघटना ही एका कुंटूबासारखी असावी, येथून पुढचा मुळ लढा जुनी पेन्शन योजना अंमलात आणण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने कार्यरत राहावे, असे ही विश्वास काटकर यांनी यावेळी बजावले. याप्रसंगी महसूल विभागाचे राज्य सरचिटणीस श्री. नरेंद्र जगताप, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष डॉ.संजय पाटील, राज्य सहकोषाध्याक्ष श्री. सुधाकर सुर्वे, प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्र सरतापे हे खास मुंबईहुन उपस्थित होते तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व विभागांचे कर्मचारी उपस्थित होते