इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मिरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, मी देशवासियांना आश्वासन देतो की या घटनेच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार आवश्यक आणि योग्य ते सर्व पाऊल उचलेल. आणि आम्ही फक्त ही घटना घडवून आणणाऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही. ज्यांनी पडद्यामागे बसून भारतीय भूमीवर असे नापाक कृत्य करण्याचे षड्यंत्र रचले आहे. त्यांच्यापर्यंतही आम्ही पोहोचू.
येथे मी भारताच्या दहशतवादाविरुद्ध zero tolerance policy धोरण असल्याचा निर्धार पुन्हा व्यक्त करू इच्छितो. या भ्याड कृत्याविरुद्ध भारतातील प्रत्येक नागरिक एकजूट असल्याचेही त्यांनी सांगितले.
मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिद
या हल्यामागे असलेल्या दहशवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. आदित गुरु, आसिफ शेख, सुलेमान शाह, अबू तल्हा अशी त्यांचे नावे आहे. यातील दोन स्थानिक आहेत. तर दोन जण पाकिस्तानी आहेत. आदिल गुरी हा अनंतनाग जिल्हयातला आहे. तर आसिफ शेख हा सोपोरचा आहे. या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड हा सैफुल्लाह खालिद उर्फ कुसरी असल्याचे समोर आले आहे. तो टीआरएफ या दहशवादी संघटनेचा प्रमुख असून हाफिज सईदचा तो निकटवर्तीय आहे.