नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नंदिनी नदीच्या पुनरूज्जीवनासाठी अनेक संस्था आणि नागरीक गेल्या वर्षभरापासून मुंबई नाका परिसरातील भारतनगर भागात काम करत आहेत. आज स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन मोहीम सुरू असताना ग्रुपच्या सदस्यांना Salvosuper E या स्फोटकाच्या हजारो कांड्या गोण्यामध्ये घालून नदीत फेकलेल्या आढळल्या. या कांड्या काल ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता फेकण्यात आल्या असे स्थानिकांनी सांगितले. ही बाब अतिशय गंभीर असून पालिका प्रशासन, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी चला जाणूया नंदिनी नदीला अभियानाचे राजेश पंडित यांनी केली आहे.
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या विषयात जातीने लक्ष घालून सिनीयर पीआय मुंबई नाका यांना सांगितले. नंतर पोलीस विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली BDDS तसेच dog sqaud यांनी पाहणी करून पंचनामा करून सर्व ताब्यात घेतले व दोषींवर करणार असे आश्वासन दिले.