मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्न झाल्यावरही अनेक दाम्पत्य बाळ होत नाही म्हणून टेन्शनमध्ये असतात. बरेच उपाय करतात. त्यावरही सरकारने दत्तक योजना उपलब्ध करून दिली आहे. पण तरीही बॉयलॉजिकल अपत्यासाठी बहुतांश लोकांचा हट्ट असतो. राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने मात्र संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे, कारण येथील एका गर्भवतीने एकाचवेळी दोन मुले-दोन मुलींना म्हणजे चार बाळांना जन्म दिला आहे.
राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात वजीरपुरा नावाचे गाव आहे. या गावातील एका जोडप्याचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले. अर्थातच गावातील कुटुंब असल्याने बाळ होत नाही म्हणून चर्चा होत असेल. पण तरीही जोडप्याला विश्वास होता. काही महिन्यांपूर्वी महिला गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आनंदाचे वातावरण होते. अशात एक दिवस डॉक्टरांनी महिलेला सांगितले की तुझ्या पोटात चार अर्भक आहेत. हे ऐकून जोडप्याला फारसे काही वाटले नाही. पण डॉक्टरांना गर्भपात होण्याची शंका निर्माण झाल्याने गर्भाशयाला विशिष्ट तंत्राने सील करण्यात आले. जेणेकरून ते केवळ तपासणीच्याच वेळी उघडण्यात येईल. त्यानंतर अखेर प्रसुतीची वेळ आली.
प्रसुती झाल्यावर जे काही घडले त्याने घरातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होता. कारण महिलेने चार बाळांना जन्म दिला होता. आणि त्यात दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. चारही बाळांचा जन्म एक एक मिनिटाने झाला. विशेष म्हणजे डॉक्टरांनी असा प्रकार दहा लाखांतून एकाच गर्भवतीच्या बाबतीत घडतो, असे म्हटले आहे. १५ वर्षांपूर्वी एका महिलेने चार बाळांना एकाचवेळी जन्म दिला होता.
देनेवाला जब भी देता…
या जोडप्याने बाळ व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले. ईश्वराकडे प्रार्थना केली. नैराश्य येण्याची शक्यता होती. पण त्याचवेळी महिला गर्भवती राहिली आणि एक-दोन नव्हे तर तब्बल चार बाळांना महिलेने जन्म दिला. त्यामुळे ‘देने वाला जब भी देता देता छप्पर फाड के’ याची प्रचिती आल्याचे बोलले जात आहे.
Two boys – two girls born at the same time in Rajasthan
Rajasthan Women Given Birth to 4 Childrens
Double Twins Tonk Vajirpur