इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ज्या सुरक्षा रक्षकावर युनिव्हर्सिटीतील तरुणींचे रक्षण करण्याची जबाबदारी होती, त्यानेच मुलींचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली. याप्रकरणात संबंधित विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा संताप आता आंदोलनाच्या रुपात रस्त्यावर दिसू लागला आहे.
राजस्थानमधील अजमेर सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील या घटनेची चर्चा देशभर होत आहे. पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली असून त्याने फोटो का काढले, याची कसून चौकशी होत आहे. या सुरक्षा रक्षकाने विद्यार्थिनींचे फोटो काढून पहिले सोशल मिडियावर व्हायरल केले आणि त्यानंतर त्याने ज्या मुलींचे फोटो काढले त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. हा प्रकार त्याने का केला, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र एका विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार हे काम तो कुणासाठी तरी करत होता. कारण त्याने काही विशिष्ट्य मुलींचे फोटो काढून माहिती घेतो, असे कुणाला तरी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकाराच्या विरोधात विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. गुरुवारी रात्री एकवाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. मुख्य म्हणजे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली. या घटनेची माहिती व्हायरल होताच पोलीस प्रशासनाने दखल घेतली व विद्यापीठ परिसर ताब्यात घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले. आरोपी सुरक्षा रक्षकाला विद्यापीठातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला केली आहे.
एक नव्हे अनेक
या सिक्युरीटी गार्डने एक दोन नव्हे तर अनेक मुलींचे लपून फोटो काढले होते. त्यानंतर त्याने टप्प्याटप्प्याने एका एका मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. राजपाल रेवाड असे त्याचे नाव आहे. मुख्य म्हणजे ज्या मुलींचे त्याने फोटो काढले त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास विद्यापीठ प्रशासनाने मज्जाव केला आहे. त्यामुळे प्रशासन काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याची शंकाही व्यक्त होत आहे.
Rajasthan University Security Guard Young Girls Blackmail
Photo Viral Social Media