नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केरळ स्टोरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रकारे भारतीयांच्या मनात कोलाहल माजलेला आहे. अश्यात काही लोक हे सारे चुकीचे असल्याचा आरोप करत आहेत, तर काही लोक या चित्रपटामुळे सावध झाले आहेत. मात्र त्याचवेळी काहींनी याचा फायदा घेण्याचाही प्रयत्न केला आहे.
राजस्थानमध्येही एका कंपनीसोबत असाच प्रकार घडला. ही अंडरगारमेंटचे उत्पादन घेणारी कंपनी असून या कंपनीत ९२ लाख महिलांचा डेटा आहे. व्यवसायाचा व्याप मोठा असल्यामुळे कंपनीने हा डेटा सुरक्षित ठेवला आहे. कुठल्याही प्रकारचा वाईट वापर या डेटाचा होऊ नये, याचीही काळजी घेण्यात आली. परंतु, आरोपीने एक दिवस कंपनीचा डेटा हॅक करून त्यातील १५ महिलांची माहिती विकल्याचे स्पष्ट झाले होते.
काही दिवसांनी या आरोपीने कंपनीला एक ई-मेल केला. त्यात १५ लाख हिंदू मुलींचा डेटा मुस्लीम देशांना विकणार असल्याची धमकी दिली. यात त्याने कंपनीकडे सव्वा लाख रुपयांची मागणीही केली होती. ही मागणी पूर्ण केली नाही तर १५ लाख हिंदू मुलींचा डेटा मुस्लीम राष्ट्रांना विकेन, असे तो म्हणाला होता. जातीय व धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करू नये, असा रिप्लाय संबंधित कंपनीने आरोपीला केला. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी हा गारमेंट व्यवसायाशीच संबंधित असल्याचे पुढे आले.
त्याच कंपनीचा आरोपी
ज्या व्यक्तीने हा प्रकार केला त्याचे नाव संजय सोनी असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे संजय सोनी हा देखील याच अंडरगारमेंट कंपनीचा एक भाग असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. संबंधित कंपनी राजस्थानमधील उदयपूर शहरातील असून आरोपी देखील तिथलाच रहिवासी आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Rajasthan Story 15 lakh Hindu Girl Data Sale Muslim Country