इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – फेमिना मिस इंडिया २०२३ ची घोषणा झाली आहे. यावेळी मिस इंडियाचा मुकुट राजस्थानच्या नंदिनी गुप्ताच्या डोक्यावर आहे. तर दिल्लीची श्रेया पुंजा ही फर्स्ट रनर अप आणि मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग दुसरी रनर अप ठरली. मिस इंडिया २०२३ चा ग्रँड फिनाले इंफाळ, मणिपूर येथे झाला. यामध्ये अनन्या पांडे ते कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि नेहा धुपिया सारख्या बॉलिवूड स्टार्सचा सहभाग होता.
यावेळी माजी विजेतेही उपस्थित होते. ज्यामध्ये सिनी शेट्टी, रुबल शेखावत, शिनाता चौहान, मनसा वाराणसी, मनिका श्योकंद, मन्या सिंग, सुमन राव आणि शिवानी जाधव यांनीही आपला परफॉर्मन्स दिला. यादरम्यान मनीष पॉल आणि भूमी पेडणेकर यांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली.
फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स 2022 आणि मार्गदर्शक नेहा धुपिया, नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस, दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी, बॉक्सिंग आयकॉन लैश्राम सरिता देवी आणि डिझाइनर रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा यांचा समावेश असलेल्या एलिट पॅनेलने विजेत्यांचे परीक्षण केले.
या सौंदर्य स्पर्धेसाठी देशभरातील महिलांनी सहभाग घेतला आणि आपले कौशल्य पणाला लावले. त्यापैकी नंदिनी गुप्ता हिने किताब जिंकला. या स्पर्धेत २९ राज्यांचे प्रतिनिधी आणि सर्व केंद्रशासित प्रदेशातील स्पर्धक आले होते, त्यापैकी ३० स्पर्धकांचा समावेश होता.
नंदिनी गुप्ता ही फक्त १९ वर्षे वयाची आहे. नंदिनी सध्या मॉडेल असून तिने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. नंदिनी लहानपणापासूनच खूप कुशाग्र आहे. शाळेतील स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्येही ती भाग घेत असे. नंदिनी ही राजस्थानच्या कोटा येथील रहिवासी आहे. ‘फेमिना मिस इंडिया’ची विजेती बनण्याचे तिचे स्वप्न होते. आणि आज तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नंदिनी ही ‘फेमिना मिस इंडिया राजस्थान’ची विजेती आहे. नंदिनी ही सोशल मीडियावर खुपच अॅक्टिव्ह आहे. इन्स्टग्रामवर तिचे ११.१K फॉलोवर्स आहेत. नंदिनी ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Rajasthan Nandini Gupta Win Femina Miss India 2023