इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानच्या हनुमानगडमध्ये मिग २१ हे लढाऊ विमान थेट ग्रामीण भागातील घरावर कोसळले आहे. या अपघातात ४ ग्रामस्थांचा मृत्यू झाला असून, दोन जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. फायटर जेटचा पायलट आणि को-पायलट दोघेही सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे एक लढाऊ विमान हनुमानगड जिल्ह्यातील पिलीबंगा येथील बहलोल नगर गावाजवळ एका घरावर कोसळले. अपघातादरम्यान पायलटने पॅराशूटमधून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र विमान घरावर कोसळताच आजूबाजूचे लोक त्याच्या कचाट्यात आले. या अपघातात आतापर्यंत चार ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. मदतीसाठी पिलीबंगा पोलीस आणि लष्कराचे हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले आहे.
अपघातानंतर गावातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पॅराशूटच्या सहाय्याने विमान उतरवणाऱ्या पायलटला मदत केली. लोकांनी पायलटला सावलीत झोपवले आणि त्याला प्राथमोपचारासाठी मदत केली. त्याचवेळी विमान पडलेल्या घरातील आग काही लोकांनी विझवली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
https://twitter.com/IAF_MCC/status/1655446544164995075?s=20
अपघाताचे प्रत्यक्षदर्शी हरीश आणि इतरांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाच्या पायलटने मोठ्या शिताफीने विमान गावाच्या सीमेवर आणले, विमान दाट लोकवस्तीच्या परिसरात पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. ज्या घरात विमान पडले तेथे मुले खेळत होती.
फायटर जेटने सूरतगड एअर बेसवरून उड्डाण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तांत्रिक बिघाडामुळे टेक ऑफ केल्यानंतर १५ मिनिटांत वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले. अपघातापूर्वी दोन्ही वैमानिकांनी विमानातून बाहेर पडून स्वतःला वेगळे केले होते. पॅराशुटमुळे विमानाचा पायलट आणि सहवैमानिक दोघेही सुखरूप बचावले. मात्र निवासी भागात बांधलेल्या कच्च्या घरावर विमान पडल्याने ग्रामीण महिलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मरण पावलेली एक महिला आपल्या गुरांसाठी चारा गोळा करण्यासाठी बाहेर पडली असताना त्यांना मिग-२१ या अपघातग्रस्त विमानाने धडक दिली.
https://twitter.com/ShivAroor/status/1655448359388291072?s=20
Rajasthan IAF Mig Crash in Village 4 Death Pilot Safe