इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानमध्ये दोन सख्ख्या बहिणींनी एकाच वराशी लग्न केले. या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. दोन्ही कुटुंबांची संमतीही होती आणि हा विवाह कोणत्याही छुप्या मार्गाने झाला नसून मोठ्या थाटामाटात पार पडला.
हे प्रकरण टोंक जिल्ह्यातील उनियारा येथील मोरझालाच्या झोपडिया गावातील आहे.नवरदेव हरिओम मीनाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. दुसरीकडे, निवई तहसीलच्या सौंद्रा खडायाच्या धानी येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींपैकी मोठ्या बहिणीने उर्दूमध्ये एमए केले आहे. धाकटी बहीण आठवीपर्यंत शिकली आहे.
रामप्रसाद मीणा यांनी बाबूलाल मीणा यांची थोरली मुलगी कांता हिच्यासाठी मुलाकडे आमंत्रण पाठविले. मात्र, कांताने एक अट घातली. ती म्हणजे, दोन्ही सख्ख्या बहिणी एकत्र लग्न करतील. ते मान्य असेल तरच पुढचा निर्णय होईल. नवरदेव हरिओमनेही होकार दिला आणि त्यानंतर कांता आणि सुमन यांचा हरिओमशी ५ मे रोजी विवाह झाला.
धाकटी बहीण सुमन ही मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. आणि मोठी बहिण कांता तिची काळजी घेते. सुमन तिच्यासोबत राहिली तर कांता तिची काळजी चांगल्यारित्या घेऊ शकेल. म्हणूनच कांताने तशी अट घातली. आणि हरिओमच्या घरच्यांनी ती मान्य केली. त्यामुळेच हे लग्न पार पडले.
५ मे रोजी वराने दोन्ही बहिणींसोबत मंडपात सात फेरे घेतले. हरिओम पदवीधर आहे. कांताने उर्दूमध्ये एमए केले आहे. दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. धाकटी बहीण सुमन आठवीपर्यंत शिकली आहे. दोन्ही सख्ख्या बहिणींसोबत लग्न करून आनंदी आहे. दोघांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन, असे हरिओम सांगतो.
Rajasthan Groom Married with 2 Sisters