इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपण साधारणतः बोलताना म्हणतो की, हाताची पाचही बोटे सारखी नसतात. म्हणजेच प्रत्येकाच्या हाताला आणि पायाला प्रत्येकी पाच बोटे असतात, हे सर्वांनाच माहित आहे. परंतु काही स्त्री – पुरुषांना हाताला किंवा पायाला ६ देखील बोटे असू शकतात. मात्र एखाद्या बालकाला पायाला किंवा हाताला ६ किंवा ७ बोटे असतील तर ती निश्चितच आश्चर्यकारक घटना म्हणावी लागेल. अशीच एक घटना राजस्थानच्या डीग जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील एक नवजात बाळ चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे हे बाळ २६ बोटे घेऊन जन्माला आले आहे. त्याच्या दोन्ही हाताला प्रत्येकी ७ आणि दोन्ही पायाना प्रत्येकी ६ बोटे आहेत. ती पाहण्यासाठी बघ्यांच्या जणू काही रांगा लागल्या आहेत.
डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का
लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशनच्या हातात सहा बोटे आहेत, त्याने ती अद्याप ते बोट काढलेले नाही. तो बॉलिवूडमधला एक यशस्वी कलाकार मानला जातो. आतापर्यंत त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. कारण हात किंवा पायाची सहा बोटे असणारे लोक खूप भाग्यवान मानले जातात. असे मानले जाते की अशा लोकांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असते आणि ते कोणतेही काम करण्यास सक्षम असतात. कुटुंबीय या नवजात कन्येला ढोलगड देवीचा अवतार मानत आहे. हे अनोखे बाळ पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमत आहे. कामा शहरातील गोपीनाथ मोहल्ला येथे राहणाऱ्या गोपाल भट्टाचार्य यांची ८ महिन्यांची गर्भवती पत्नी सरजू देवी ( वय २५) हिला रात्री प्रसूती वेदना होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. गोपाल सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. पत्नीने दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिला, तेव्हा काही काळ डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मुलीला एकूण २६ बोटे आहेत. सामान्यतः माणसाच्या एका हाताला ५ बोटे असतात. परंतु अशाही काही व्यक्ती आहेत ज्यांच्या हाताला किंवा पायाला पाचपेक्षा अधिक बोटे असतात. सहा बोटं असणाऱ्या व्यक्तींना खूपच भाग्यशाली मानले जाते. असे मानले जाते की या व्यक्तींची बुद्धी खूपच तल्लख असते.
हा एक प्रकारचा विकारच
हाताला किंवा पायाला सहा बोटे असणे हा काही आजार नाही, हे अत्यंत सामान्य आहे. पण ज्या व्यक्तीच्या हाताला किंवा पायाला सहा बोटे असतात ती व्यक्ती स्वतःच खास बनते. वास्तविक, वैद्यकीय शास्त्र याला एक प्रकारचा विकार मानते, त्याला पॉलीडॅक्टीली असे नाव देण्यात आले आहे, परंतु ज्योतिषशास्त्र याला निसर्गाची देणगी आणि सौभाग्याचे प्रतीक मानते. जर्मनीतील फ्रीबर्ग विद्यापीठात झालेल्या एका संशोधनानुसार सहा बोटे असलेल्या लोकांचा मेंदू वेगवान असतो.
संशोधन सांगते
बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या संशोधनानुसार, पॉलीडॅक्टिली सिंड्रोम गर्भाच्या विकासादरम्यान होतो. वास्तविक, गर्भाच्या विकासादरम्यान, हातमोजासारखा आकार तयार होतो, त्यानंतर बोटे आकार घेतात. या प्रक्रियेत काही अडथळे किंवा बदल झाल्यास सहावे बोट तयार होते. बऱ्याच बाबतीत ते अनुवांशिक आहे. म्हणजेच जर कुटुंबातील कोणाला हा सिंड्रोम असेल किंवा जवळचा नातेवाईक या समस्येने ग्रस्त असेल तर त्याची शक्यता अधिक वाढते. तसेच एका संशोधनानुसार सुमारे १००० पैकी एका व्यक्तीलाला जन्मतःच हाताला किंवा पायाला सहा बोटे असतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, हे अतिरिक्त बोट तर्जनी आणि अंगठ्याच्या दरम्यान असते. असे बोट असणारे सुमारे निम्मे लोक याला आजार मानतात आणि शस्त्रक्रियेद्वारे हे सहावे बोट काढतात. परंतु या बालिकेच्या यामुळे महिला आणि तिचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. हे कुटुंब कन्येला ढोलगड देवीचा अवतार मानत आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ केस आहे, २६ बोटे असण्यात कोणत्याही प्रकारची हानी नाही. परंतु, अनुवांशिक विसंगतीमुळे हे घडते. ही मुलगी पूर्णपणे निरोगी आहे, असे कामा हॉस्पिटलचे डॉ.बी.एस.सोनी यांनी सांगितले.
Rajasthan Deeg District 26 Fingers Girl Child Birth New Born Baby