इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की चोर हे नेहमीच पोलिसांपेक्षा हुशार असतात, त्यामुळे कितीही प्रगत तंत्रज्ञान आले आणि तपासामध्ये अत्याधुनिक पद्धती आली तरीही चोरी करणारे अट्टल गुन्हेगार वेगवेगळे फंडे वापरून चोऱ्या करतात. राजस्थान मधील काही चोरट्यांनी तर कमालच केली. सुरुवातीला कर्जबाजारी असतानाही त्यांनी एक वेगळीच शक्कल किंवा आयडिया लढवली. पोलिसांनी त्यांने पकडले खरे पण त्यांच्या गुन्ह्याचे किस्से ऐकून आता पोलिसच चक्रावले आहेत.
एटीएम कार्ड चोरुन
चक्क भाड्याने एटीएम कार्ड घेऊन ते विमानाने दुसऱ्या राज्यात जात असत तेथे ग्रामीण भागातील एटीएम मध्ये जाऊन रेकी करत सुरुवातीला रेकी करत असत, ज्या एटीएम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षा गार्ड नाही याची संधी साधत. भाड्याने आणलेल्या एटीएम चा पासवर्ड वापरून पैसे काढत असतानाच एक जण लगेचच विद्युत पुरवठा लाईट विद्युत प्रवाह बंद करीत असे मेन स्विच बंद करत असे त्यामुळे पैसे निघाल्यावर त्याची बँकेच्या संगणकामध्ये पैसे काढल्याची नोंद होत नसेल मात्र एटीएम कार्ड मालकाचे पैसे गेल्याने ते तक्रार करीत आणि बँकेकडून पुन्हा त्या खात्यावर पैसे जमा होत असत पुन्हा हे अट्टल गुन्हेगार तथा चोरटे त्या एटीएम कार्डचा वापर करीत असत अशा प्रकारे त्यांनी कोट्यावधी रुपये काढले किती पैसे काढले याचा हिशोब देखील त्यांच्याकडे नाही या सर्व प्रकरणामुळे पोलीस देखील चक्रावले असून येवढी प्रचंड संपत्ती पाहून पोलिसांचा विश्वासच बसेना.आता या प्रकरणाची सर्व राजस्थानमध्ये चर्चा होत आहे.
पूर्वी कर्जबाजारी, आता मालामाल
आपण चित्रपटात अनेक वेळा बँकेवरील दरोड्याचे दृश्य पाहतो, प्रत्यक्षात देखील अशा घटना घडल्याचे आपण वाचतो. मात्र बँकेत जाऊन दरोडा घालण्याऐवजी अप्रत्यक्षपणे अत्याधुनिक तंत्रज्ञाने सायबर क्राईम करणाऱ्या राजस्थान मधील मेवात ठकसेनांची ही टोळी वेगळीच आहे. या टोळीतील चोरट्यांवर आधी लाखो रुपयांचे कर्ज होते. मात्र, या टोळीमध्ये सामील झाल्यापासून ते मालामाल झाले. काही चित्रपटात असे मालामाल झालेले लोक आपण पाहतो परंतु येथे प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे, त्यातील काहींना कार घेतली. काहींना फ्लॅट तर काहींनी शोरूम उघडला. तर काहींनी आपल्या नावावरील लाखो रुपयांचे कर्ज काही दिवसातच फेडले आहे. सर्व काही चोरलेल्या पैशातून केले असूनही रक्कम त्यांनी बँकांना फसवून मिळवली होती.
असे झाले गजाआड
भामटे ग्रामीण भागातील एटीएममधून पैसा काढायचे आणि महागड्या हॉटेलात राहून मौजमजा करायचे. आधी ओळखीच्या लोकांकडून भाड्याने एटीएम कार्ड घ्यायचे. त्या एटीएम कार्डद्वारे पैसा काढायचे आणि कमिशन म्हणून त्यानी निम्मी रक्कमही द्यायचे. त्यामुळे या भामट्यांवर कुणाचाच संशय राहत नव्हता. मात्र जयपूर आंतरराष्ट्रीय विमातळावर हे भामटे हैदराबादच्या विमानाने येणार असल्याची खबर मिळाली. त्यानंतर सीआयडी, डीएसटी आणि विमानतळ पोलिसांनी विमानतळावर पाहारा ठेवून पाच जणांना अटक केली. विशेष म्हणजे या भामटयांची वेशभूषा पाहून पोलीसही चक्रावले. पण त्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे त्यांना अटक करण्यात आली आहे, जुबेर खान, लुकमान दीन, सद्दाम खान, इलियास आणि मुस्ताक मोहम्मद अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून ७५ एटीएम कार्ड आणि २ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. हे सर्व आरोपी भरतपूर जिल्ह्यातील डीग येथील राहणारे आहे. महाराष्ट्र आणि तेलंगना सारख्या राज्यात विमानाने जाऊन पैसे काढायचे. त्यांनी आतापर्यंत किती लुटमार केली याचा आकडाही त्यांना माहीत नाही. त्यांनी अनेक राष्ट्रीय बँकांवर कोट्यवधी रुपयाचा डल्ला मारला आहे.
Rajasthan Cyber Crime Bank ATM Robbery Police Arrested