मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

फसवणूक प्रकरणः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या पुत्राने केला हा खुलासा

by India Darpan
मार्च 20, 2022 | 12:46 pm
in स्थानिक बातम्या
0
vaibhav gehlot

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आमिष दाखवून नाशिकमधील युवकासह व्यावसायिकांना तब्बल सहा कोटी, ८० लाखांना गंडवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाच्या ‘ई-टॉयलेट’ जाहिरातीच्या ई-टेंडरींगच्या कामात गुंतवणूक केल्यास कोट्यावधीचा नफा होऊ शकतो, असे ते आमिष होते. याप्रकरणी गुजरातमधील १५ संशयितांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांचा त्यात समावेश असल्याचा आरोप सुशिल पाटील यांनी केला आहे. तसेच, यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी आता वैभव गेहलोत यांनी खुलासा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१८ ते २०२० दरम्यान ही घटना घडली. सुशिल भालचंद्र पाटील (वय ३३, रा. ओमकार बंगला, गितांजली को-अॉप सोसायटी, वाघ गुरुजी शाळेसमोर, पंपींग स्टेशन, गंगापूर रोड) यांना या प्रकरणात गंडवण्यात आले आहे.
सुशिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी संगनमत करून विश्वास संपादन केला. राजस्थान सरकारच्या नावाने ई-टॉयलेट पर्यटन विभागाचे जाहिरातीसाठी ई-टेंडरचे संपूर्ण राज्याचे कामकाज समाविष्ट आहे. त्यात गुंतवणूक केल्यास कोट्यावधीचा नफा मिळू शकतो. असे खोटे आश्वासन देत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
सुशिल पाटील व संंबंधित व्यावसायिकांकडून २०१८ ते २०२० दरम्यान तीन कोटी, ९३ लाख, ५४ हजार, ७८८ रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेतले. तसेच उर्वरीत रक्कम रोख घेतली. या रक्कमेचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी वैभव गेहलोत म्हणाले की, ज्या फसवणूक प्रकरणात माझे नाव गोवण्यात आले आहे त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तसे तसे खोटे आरोप आणि कारस्थाने वाढत आहेत.

मीडिया में किसी प्रकरण को लेकर जिस तरह चल रहा है, जिसमें मेरा नाम भी डाला गया है, मुझे उसके बारे में कोई जानकारी नहीं है और मेरा इस सब से कोई सम्बन्ध नहीं है। हम सभी जानते हैं कि जैसे-जैसे चुनाव नजदीक आएंगे झूठे आरोपों के साथ-साथ ऐसी कारस्तानियां और मैनिपुलेटेड बातें सामने आएंगी।

— Vaibhav Gehlot (@VaibhavGehlot80) March 19, 2022

संशयितांची नावे अशी
सुशिल भालचंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सचिन पुरुषोत्तमभाई वेलेरा (रा. भावकुंज सोसायटी, अहमदाबाद, गुजरात), वैभव गहलोत (सरदारपुरा, जोधपूर), किशन कांतेलिया, सरदारसिंग चौहान, ‘नीडल क्राफ्ट’ चा अधिकृत व्यक्ती, प्रविणसिंग चौहान, सुहास सुरेंद्रभाई माकवाल, निरवभाई महेशभाई विर्माभट, बिश्वरंजन मोहंती, राजबिरसिंग शेखावत, प्रग्येशकुमार विनोदचंद्र प्रकाश, संजयकुमार देसाई, सावनकुमार पारनेर, सौ. रिशिता शहा, विराज पांचाल यांच्याविरुद्ध भादंवि कायदा कलम ४२०, ४०६, ४६८, ४७१, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक संजय भिसे तपास करत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मिशन इयत्ता दहावीः कोण म्हणतं वेळ पुरत नाही (बघा हा व्हिडिओ)

Next Post

भुवनेश्वर येथे राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या मुलीने वेटलिफ्टींगमध्ये रचला राष्ट्रीय विक्रम

Next Post
IMG 20220320 WA0150 2

भुवनेश्वर येथे राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या मुलीने वेटलिफ्टींगमध्ये रचला राष्ट्रीय विक्रम

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011