विशेष प्रतिनिधी, जयपूर :
राजस्थानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची सध्या २८ नवीन प्रकरणे नोंदली गेली. त्यात कप्पा व्हेरिएंट या नव्या विषाणूचा राज्यात झाला शिरकाव असून त्याच्या ११ प्रकरणांची नोंद झाली आहे. परंतु डेल्टा प्रकारापेक्षा हा कमी प्राणघातक आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय व आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी दिली.
डॉ. रघु शर्मा म्हणाले की, सध्या देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट जवळजवळ कमकुवत झाली आहे. परंतु अद्याप काही ठिकाणी नवीन कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. त्याच वेळी राजस्थानमध्ये कोरोना विषाणूच्या कप्पा प्रकारात संक्रमित ११ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी चार जण अलवर आणि जयपूरचे, दोन बाडमेर आणि एक भिलवारा येथील आहेत. या प्रकरणांची खात्री झाली आहे, मात्र डेल्टा फॉर्मपेक्षा कप्पा फॉर्म जरी प्राणघातक आहे. मंगळवारी राजस्थानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची २८ नवीन प्रकरणे नोंदली गेली. तसेच राज्यात ६१३ रूग्ण उपचाराधीन आहेत.
राजस्थानात कोरोनाचे ९.५३ लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ९.४३ लाखांहून अधिक लोकही बरे झाले आहेत. तर ८,९४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा कप्पा प्रकार पहिल्यांदा ऑक्टोबर २०२० मध्ये भारतात सापडला. हे कोरोनाव्हायरसचे दुहेरी उत्परिवर्तन आहे. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत कप्पाच्या प्रकारांची प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याचे समजते. त्यामुळे काही तज्ज्ञ या प्रकारास अत्यंत संक्रामक आणि धोकादायक मानत आहेत.