इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाणे येथील आनंद आश्रम येथे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा होती. पण, आज अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला मंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांचा विरोध असल्याचे बोलले जात होते. पण, शिंदे यांनी या तिघांमध्ये समेट घालून हा प्रवेश सोहळा केला.
राजन साळवी यांच्यामुळे कोकणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला….बघा संपूर्ण पत्रकार परिषद
https://twitter.com/Shivsenaofc/status/1890025358289785242