इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आज भाजपचे आमदार व पदाधिका-यांच्या भेटी घेतल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या भेटी झाल्याचे बोलले जात आहे. नाशिकच्या आगामी विकासाच्या दृष्टिकोनातून ही चर्चा करण्यासाठी भेट झाल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत त्यांनी आमदार सीमाताई हिरे,आमदार देवयानीताई फरांदे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, महेश हिरे, विजय साने, सुनील केदार यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या भेटी
या भेटीनंतर राजाभाऊ वाजे म्हणाले की, नाशिकच्या विकासाच्या अनुषंगाने अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली. आगामी काळात एकत्रितरित्या विकासासाठी प्रयत्न करण्याबाबत एकमत झाले.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुका या शिवसेना ठाकरे गटाविरुध्द लढवल्या. त्यामुळे या दोन्ही पक्षांत विसंवाद होता. पण, कुंभमेळाव्याचे निमित्ताने का होईना या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी झाल्या. पण, या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ठाकरे गटाची ही भाजपची जवळीक बघून शिवसेना शिंदे गटाची मात्र चिंता वाढली आहे.