सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांच्या पत्नी व शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभाचे खासदार राजाभाऊ प्रकाशभाऊ वाजे यांच्या मातोश्री रोहिणी प्रकाश वाजे यांचे आज शुक्रवारी येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या.
प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी घरीच होत्या. मात्र, आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती प्रकाश भाऊ वाजे आणि खासदार राजाभाऊ वाजे, सून दीप्ती वाजे, पुतणे, नाती जावई, असून संगमनेर नाका येथील अमरधाम स्मशानभूमीत शुक्रवारी सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.