इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर मधील निवासस्थानी उध्दव ठाकरे हे आज सहकुटुंब गणपती दर्शनासाठी गेले. तीन दिवसांपूर्वी
पत्रकारांनी अमित ठाकरे यांना गणेशोत्सवानिमित्त उध्दव ठाकरे शिवतीर्थावर येणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर अमित ठाकरे यांनी सरप्राइस असा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी फोनवरुन उध्दव ठाकरे यांना निमंत्रण दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्यांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. मातोश्रीवर पोहोचल्यावर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब बसायचे त्या विशेष खुर्चीला वंदन करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर आता उध्दव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी जाणार असल्याचे बोलले जात होते. ते आज गेले.
काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावर एकत्र आले. त्यानंतर हे दोन्ही बंधू उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आले. त्यानंतर ही तिसरी भेट आहे.
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1960607574937493635