मुंबई – विविध कारणांवरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लक्ष्य करीत असतात. मात्र, आज त्यांनी मोदी आणि केंद्राचे आभार मानले आहेत. त्याचे कारण म्हणजे, केंद्र सरकारने मुंबईतील हाफकीन्स या संस्थेले कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन या लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. देशातील लसीकरणात ही बाब महत्त्वाची असल्याचे राज यांनी म्हटले आहे.
बघा, काय म्हणताय राज ठाकरे
https://twitter.com/RajThackeray/status/1382914795540652033