मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाऊबीजेनिमित्त नव्या घरात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सध्या ते राहत असलेला त्यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान यापुढे नसणार आहे. कृष्णकुंज हे निवासस्थान अतिशय प्रसिद्ध झाले आहे. मात्र, आता राज यांच्या निवासाचा नवा पत्ता असणार आहे. राज यांनी कृष्णकुंज शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधली आहे. या नव्या घराचे नाव शिवतीर्थ असे आहे. त्यामुळे यापुढे राज यांचा नवा पत्ता कृष्णकुंज नाही तर शिवतीर्थ असा राहणार आहे. आज थोड्याच वेळात ते नव्या घरात प्रवेश करणार आहेत. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. झेंडूसह विविध फुलांच्या माळांनी घर सजविण्यात आले आहे.
राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री आणि बहिण यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेतले. आता तिघांचीही तब्ब्येत चांगली आहे. त्यामुळेच भाऊबीजेच्या मुहूर्तावर आता ते नवा गृहप्रवेश करणार आहेत.