मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले आहे. सध्या दिवाळीचा उत्सव सुरू आहे. त्यामुळे शुभेच्छा देणारे हे पत्र नसून एका गंभीर समस्येसंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्राद्वारे संवाद साधला आहे. एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सध्या आंदोलन आणि उपोषण सुरू केले आहे. राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. मात्र, या उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती राज यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. सरकारने जर तसा निर्णय घेतला तर एसटी कर्मचारी-कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशाराही राज यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी दिलेले पत्र असे