मुंबई – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नितांत श्रद्धा आहे. बाबासाहेबांचे निधन झाल्याचे कळताच तातडीने राज हे मुंबईहून पुण्याला गेले. त्यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच, अंत्यविधी प्रसंगीही ते उपस्थित होते. बाबासाहेबांचा राज यांच्यावर मोठा स्नेह होता. राज यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली होती. त्यानंतर राज यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला. विविध ठिकाणी, विविध व्यक्ती, संस्थांच्या गाठीभेटी घेतल्या. या दौऱ्यानंतर राज पुन्हा बाबासाहेबांना भेटले. त्यांच्याशी विचारविमर्श केला. आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा केली. राज हे पुणे दौऱ्यात बाबासाहेबांच्या भेटीसाठी आवर्जून जात.
नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना गंगापूर रोड परिसरात राज यांच्या संकल्पनेतून इतिहास संग्रहालय साकारण्यात आले आहे. या संग्रहालयाच्या ठिकाणीही राज हे बाबासाहेब यांना घेऊन आले होते. बाबासाहेबांमुळेच शिवाजी महाराजांचे खरे चरित्र सर्वांसमोर आले आणि घराघरात शिवाजी महाराज पोहचले, असे राज नेहमी म्हणतात. आता बाबासाहेबांचे निधन झाल्याने राज यांनी नेमकी कशी श्रद्धांजली व्यक्त केली याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. राज यांनी बाबासाहेबांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे ती खालीलप्रमाणे