ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई टोलमुक्त व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेले कित्येक वर्ष संघर्ष करत आहे. अनेक महाराष्ट्र सैनिकांवर केसेस आहेत. आता त्या केसेस मागे घेतल्या गेल्या पाहिजेत. या केसेस टोलसाठी झालेल्या आंदोलनातल्या आहेत, त्यामुळे त्या मागे घेतल्याचं पाहिजेत.
गेली अनेक वर्ष जी टोलवसुली सुरु होती, ती लूट होती. त्यातून नक्की किती पैसे गोळा झाले याचा कोणताही हिशोब नाही. पण कित्येक वर्षांच्या आंदोलनाला यश आलाय आणि मी पुन्हा माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन करतो असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, ठाण्यात विनयभंगाची जी घटना घडली, त्याबाबत ठाण्यातील पोलिसांशी आत्ताच माझं बोलणं झालं तो माणूस कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे हे महत्वाचं नाही आणि अशा लोकांना पाठीशी घालावं अशी कोणत्याच पक्षाची भूमिका नसते, पण अश्या प्रकारच्या विकृतीला पक्ष म्हणून पंखाखाली घालणार असतील तर मग काही बघायलाच नको , कुठल्याही पक्षाचा असला तरी अश्या प्रकारची विकृतींना थारा देऊ नये. आणि अश्या प्रकारची विनयभंगाची केस झाल्यावर अश्या लोकांना जमीन मिळतोच कसा हे मला कळत नाही.