इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर ठाकरे बंधु विजयी मेळावा मुंबईत वरळी डोम सभागृहात जल्लोषात संपन्ना झाला. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित यांनी जोरदार भाषण केले.
हा मेळाव संपल्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत दिलगीरी व्यक्त केली. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार.
मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो.
तबब्ल १८ वर्षांनी राज – उद्धव एकत्र
विजयी मेळाव्यासाठी मराठी कलाकांरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. तबब्ल १८ वर्षांनी राज – उद्धव एकत्र आल्यामुळे शिवसेना भवनाबाहेर जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. सुरुवातीला मुंबई वरळी डोममध्ये ‘जय जवान गोविंदा पथक’ ७ थर लावून सलामी देण्यात आली आहे. या सोहळ्यात
फक्त दोन खुर्च्या होत्या. त्याच्या मागे महाराष्ट्राचा नकाशा होता.ठाकरे बंधूंचा विराट विजयमेळाव्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते.