मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा जामिनावर कारागृहातून बाहेर आला आहे. यादरम्यानची त्याचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. राज कुंद्राचा चेहरा फोटोमध्ये स्पष्ट दिसत नसला तरी अनेकांना तो भावूक झाल्याचे दिसत आहे. तसेच अनेकांनी राजचे वजन घटल्याच्याही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अश्लील चित्रपट बनविल्याप्रकरणी राज कुंद्राला दोन महिन्यांनंतर जामीन मिळाला आहे. जेलमधून बाहेर येताच अनेक कॅमेरे आणि गर्दीला त्याला सामोरे जावे लागले. यादरम्यान राज याने आपला चेहरा मास्कने झाकलेला होता. कपाळाला मोठा टिळाही लावला होता. राजने करड्या रंगाचा टी शर्ट परिधान केला होता. गर्दीतून कसेबसे त्याला सुरक्षारक्षकांनी कारपर्यंत पोहोचविले.
फोटोवर कमेंट
राजचे फोटो पाहून अनेक ट्रोल्सनी त्याच्या प्रकृतीबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘राज कुंद्राजी खूपच बारीक झाला आहात’. दुसर्या युजरने लिहिले, ‘अरे हे तर ओळखूच येत नाहीयेत’. आणखी एका युजरने लिहिले, ‘राज कुंद्रावर काय परिस्थिती ओढावली आहे’. राजच्या कपाळावरील टिळ्यावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.