रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पावसाळ्यात वीजांपासून वाचण्यासाठी अशी करा तयारी

by Gautam Sancheti
जुलै 8, 2022 | 5:03 am
in इतर
0
rainfall alert e1681311076829

 

पावसाळ्यात वीजांपासून वाचण्यासाठी अशी करा तयारी

पावसाळ्यात अनेकदा मोठ्या प्रमाणात वादळ वारे व विजा पडत असतात. विशेषतः मान्सून काळात वीजा पडणे/वज्राघात होण्याच्या अनेक घटना घडत असतात. यामुळे मोठी मनुष्यहानी, पशुहानी होते त्याचबरोबर वित्त हानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही नैसर्गिक आपत्ती पूर्णपणे रोखू शकत नसलो तरी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपत्तीची हानीकारकता कमी करु शकतो. नागरिकांनी वज्राघात/विज पडल्यास कोणती काळजी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात, याबद्दल जाणून घेऊयात…

वज्राघात झाल्यास काय करावे व काय करू नये
सतर्कतेची/चेतावणी चिन्हे : अतिवेगवान वारे, अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंघावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावात, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना.
वस्तुस्थिती:- वीज ही सामान्यपणे उंच वस्तूंवर पडते, कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही परंतु, काही स्थाने इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत, मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामांपेक्षा जास्त सुरक्षित असतात, जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो (16 कि.मी.), वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो, अशा परिस्थितीत सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात, वज्राघात बाधीत/जखमी व्यक्तीस तुम्ही मदत करू शकता. त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसतो. त्या व्यक्तीस तात्काळ/त्वरीत मदत करावी.

काय करावे पूर्वतयारी
Ø वज्राघातापासून बचावासाठी भित्तीचित्रे / भित्तीपत्रके प्रदर्शित करा. आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करा.
Ø स्वतःसाठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसंदर्भात संपर्क करण्यासाठीचा आराखडा तयार करा.

Ø वैद्यकीय व स्थानिक आपात्कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार करणे.
Ø आपत्कालीन साधने (Emergency Kit) तयार ठेवा.
Ø जर गडगडाटी वादळाचा/अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर/घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे.

Ø वीजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानूकुलित यंत्रे बंद ठेवावे.
Ø आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे फांद्या काढून टाकणे.

तुमच्या परिसरात वादळी वारे वाहत असल्यास /विजा चमकत असल्यास
घरात असल्यास: घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा, घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर राहावे, मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच राहावे.

घराबाहेर असल्यास : त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहा. गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावाव्यात. खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यतः खिडक्या बंद असलेल्या धातूपासून तयार झालेली वाहने (बस मोटार) चांगली आश्रयस्थळे होऊ शकता. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा. जंगलामध्ये दाट, लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा. (परंतु अचानक येणाऱ्या पूरापासून सावध राहा), जर जमिनीच्या वर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा.

वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास: त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा. वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परिस्थितीत, इजळाला (बाधित व्यक्ति) व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथरमीयाचा (hypothermiya / शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल.

इजा झालेल्या इसमास पुढीलप्रमाणे हाताळा:
श्वसन बंद असल्यास:- तोंडावाटे पुनरुत्थान (Mouth-to-Mouth) प्रक्रिया अवलंबावी.
हृदयाचे ठोके बंद असल्यास:- कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती सीपीआर (CPR) करुन सुरु ठेवा.
इजाळाची / रुग्णाचा श्वास व नाडी सुरु असल्यास – इतर दुखापतींसाठी/आघातांसाठी तपासणे (भाजणे/ऐकू न येणे/ न दिसणे).

काय करू नये
तयारी:– गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे/ बस/सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/ दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी जागी जाणे, या जागांजवळ उभे राहणे टाळावे.

घरात असल्यास: वायरद्वारे जोडले गेलेले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. (अशा आपत्कालीन वेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे). गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये. या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्य करु नयेत. काँक्रिटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा (धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग व प्लंबिंग/नळ).

घराबाहेर असल्यास: मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स पासून लांब राहावे.

वज्राघात किंवा वीज पडणे ही नैसर्गिक आपत्ती आहे. ही नैसर्गिक आपत्ती कदाचित रोखली जावू शकत नाही, मात्र योग्य उपाययोजना करुन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून आपली व आपल्या संपत्तीची हानी होण्यापासून वाचू शकतो. मनुष्यहानी आणि वित्तहानी निश्चितच कमी केली जावू शकते किंवा पूर्णत: रोखलीही जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात प्रशासनाकडून जारी केल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपत्तीशी सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

– नंदकुमार ब. वाघमारे (माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे)

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चक्क अंबानींकडेही नाही अशी कार आहे कार्तिक आर्यनकडे; असं काय आहे तिच्यात खास?

Next Post

विनाकारण बेड्या घालणे भोवले! २ लाख रुपये भरपाई देण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
crime 1234

विनाकारण बेड्या घालणे भोवले! २ लाख रुपये भरपाई देण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011