मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाण मांडून असलेला पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार आहे. राज्याच्या काही भागात अति मुसळधार, काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. या अंदाजानुसार, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ९ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या अन्य भागातही पावसाचा जोर राहणार आहे.
आगामी ४ दिवसांचा जिल्हा निहाय पावसाचा अंदाज खालील प्रमाणे