मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट आलेली असतानाच आता पुन्हा हवामानात अचानक बदल होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आता पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पुढचे ४ ते ५ दिवस वीजांच्या गडगडाटासह पाऊस होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. खासकरुन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होणार असल्याचा अंदाज विभागाने दिला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी, वीजा कडाडत असतील तेव्हा शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हवामान विभागाने दिलेला तपशील पहा