लासलगाव – गेल्या वीस तासाहून अधिक काळ झालेल्या पावसाने लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालय चार फूट पाणी साचले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि येथे उपचार घेत असलेले १२ बारा जण मंगळवारी रात्री अडकले. पाण्याचा जोर वाढत असल्याने सर्व जण रुग्णालयाच्या टेरेसवर उभे होते. सातत्याने सुरू असलेला जोरदार पाऊस तर खाली रुग्णालयाला नदीचे आलेले स्वरूप हे बघता अडकलेले नागरिक सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना करत होते. तर या भागात वीज नसल्याने संपूर्ण परिसरात अंधार पडलेला होता. याबाबत माहिती मिळताच सरपंच जयदत्त होळकर, वेदिका होळकर यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, विशाल पालवे, भैया नाईक, प्रतीक चोथानी आदींनी या सर्व अडकलेल्या १२ जणांना मोठे प्रयत्न करून बाहेर काढले.
पोलीस अंमलदार शिवाजी घोडे, योगेश शिंदे, संदीप शिंदे, प्रदिप आजगे, योगेश जामदार, देवा पानसरे, दत्तू शिंदे , भैया नाईक, ओम चोथानी, प्रतीक चोथानी, प्रकाश पाटील, विशाल पालवे, दत्ता पाटील,उमेश पारीक, मयुर बोरा,मिरान पठाण, संदीप उगले, जीवन पगार रोहित शेरेकर, सोनू शेख,शहादाब मयुर झाबरे, प्रदिप त्र्यंबके, अमोल थोरे,सुरज आबड,शिवाजी जगताप, मयुर गोसावी, मयूर विस्ते, सागर अहिरे व इतर अज्ञात तरुणांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. त्यामुळेच अडकलेल्या सहा महिला, चार पुरुष व दोन बालक यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री छगन भुजबळ हे आज दुपारी साडे तीन वाजता लासलगाव येथे भेट देऊन पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.