शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात नक्की पाऊस येणार आहे की नाही? पुढील १५ दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 25, 2023 | 1:50 pm
in संमिश्र वार्ता
0
monsoon clouds rain e1654856310975

महाराष्ट्रात नक्की पाऊस येणार आहे की नाही?
पुढील १५ दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज…
‘ महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरणाचीच शक्यता अधिक ‘

जून आणि जुलै महिन्यानंतर सर्वांच्या नजरा या ऑगस्ट महिन्याकडे होत्या. पण, पावसाने साफ निराशा केली आहे. अद्यापही अनेक भागात पेरणी नाही. जिथे झाली तेथे दुबार पेरणीचे संकट आहे. आता ऑगस्ट महिना संपत आला आहे. पुढील काही दिवस तरी पावसाचे आहेत की नाही, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यासंदर्भात हवामानाचा नेमका अंदाज काय आहे ते आपण आता जाणून घेऊया…

Manikrao Khule
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

सध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक जाणवत नसुन पुढील संपूर्ण पंधरवाडा म्हणजे गुरुवार दि.७ सप्टेंबर पर्यन्त मुंबईसह कोकण व काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यताच अधिक जाणवते.
मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मध्यम पावसाची शक्यता मात्र कायम आहे.
सप्टेंबर ७ नंतरच्या पावसाची स्थिती त्यावेळीच वातावरणातील बदलानुसार कळवली जाईल.  

(i) तटस्थ ‘ भारत महासागरीय  द्वि- ध्रुविता ‘ व  (ii)कमकुवत का असेना पण सध्या अस्तित्वात असलेला पण शेष उर्वरित पावसाळी हंगामात विकसनाची शक्यता ठेवून असणारा ‘ एल-निनो ‘ आणि (iii)सध्या भारत विषववृत्तीय महासागरीय क्षेत्राच्या बाहेर भ्रमणित असलेला ‘ एमजेओ ‘  ( iv) खाली वर सरकणारा पण सध्या सरासरी जागा सोडून अधिक उत्तरेकडे सरकलेला पूर्व- पश्चिम ‘ मान्सूनचा आस ” (v) कमकुवत झालेली मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा (vi) ऐतिहासिकरित्या  उदभवून गेलेला ऑगस्ट महिन्यातील ह्यावर्षीचा पावसाचा खण्ड इ. ह्या सर्व  ६ वातावरणीय प्रणाल्या चालु ऑगस्ट महिन्यातील पावसास प्रतिकूल ठरलेल्या आहेत.

ह्या उलट मात्र देशाच्या अतिउत्तरेकडे एकापाठोपाठ नियमितपणे येणारे ‘ पश्चिमी झंजावात ‘  व त्याचबरोबर उत्तरेकडे स्थलांतरित होणारा आणि अधिक काळ हिमालय पायथा समांतरित क्षेत्रात जाऊन बसलेला ‘मान्सूनी आस ‘ ह्यामुळे  संपूर्ण उत्तर भारतात ह्या वर्षीच्या जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घालून महापुराने जनजीवन विस्कळीत करून हिमालय पर्वतीय भू -क्षेत्रही त्याने चांगलेच खिळखिळे केले आहे. २ महिने तेथील पर्यटनही धोक्यात आणले आहे.

जून, जुलै, ऑगस्ट ३ महिने एल-निनो सुप्तावस्थेत तर आयओडी तटस्थवस्थेत असतांनाही समाधानकारक पाऊस झाला नाही. तर मग आता वर स्पष्टीत केलेल्या ६ प्रणाल्यांचा सध्या अमंल असतांना आणि त्यातही विशेषतः  क्रमांक (ii) ची एल- निनो  विकसनाकडे जाणारी शक्यता पाहता पुढे पावसाची अपेक्षा कोणत्या आधारावर करावी ?

मग ह्या प्रतिकूलतेत, १ सप्टेंबर नंतर केंव्हाही राजस्थानातून मागे फिरणारा परतीच्या पाऊस आणि त्याचबरोबर नेमका ह्याच संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून पूर्वा, उत्तरा, हस्त, व चित्रा ह्या ४ नक्षत्रातून पडणाऱ्या पूर्वेकडचा ठोकवणी  पावसाची तरी काय अपेक्षा ठेवावी? म्हणूनच साशंकता वाटते. मग ह्या नकारात्मक तर्कला केवळ फक्त आय.ओ.डी.(भारत महासागरीय  द्वि- ध्रुविता) ह्या प्रणालीचा चा टेकू हा आशावाद असला तरी, ज्याने गेले ३ महिने साथ दिली नाही, त्याच्याकडून सप्टेंबरसहीत उर्वरित दिड महिन्यात पावसासाठी काय अपेक्षा ठेवावी? कारण अजुनही तो तटस्थवस्थेतच आहे.     

केवळ पावसावरच अवलंबून असणाऱ्या खरीप हंगामातील सध्याची जिरायत उभी पिके सध्या पाणी ताणावर असुन बिकट अवस्थेतून जात आहेत. तर काही जळण्याच्या मार्गांवर आहेत. शेतकरी तेथे रोटवेटर मारण्याच्या मनस्थितीत आहेत.

निसर्ग आहे, आणि काही तरी पाऊस होईलच, ह्या आशेवर, खरीपात हिरमोड झालेले शेतकरी पुन्हा रब्बी हंगामाचा  ‘ श्री गणेशा ‘ करण्याच्या तयारीत आहेत. तेंव्हा आता रब्बी हंगामातही अश्या क्षेत्रात जपूनच पावले टाकावी, असे वाटते. शेती निगडीत महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, साखर कारखानदारी, तसेच सिंचन विभाग ह्यांनाही ह्या पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यावसायिक नियोजनात गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊ शकते, असे वाटते.

  कारण, कितीही सौम्य शब्दात उतरवण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुस्थिती झाकता येत नाही. मान्सूनचे सध्याचे सर्व वास्तव व  विश्लेषण आपल्यासमोर ठेवलेलेच आहे. ह्या सर्व शक्यतेची कल्पना शेतकऱ्यांनी करून पुढील शेतपीक नियोजनाचा व संबंधित व्यवसायाचा निर्णय आपण स्वतःच घ्यावा, असे वाटते.

इतकेच !
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५

Rainfall Forecast Weather Maharashtra Climate

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

WWE चॅम्पियन ब्रे व्याट यांचे निधन… अवघ्या ३६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

Next Post

Nashik Crime १) कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार २) तरुणावर सशस्त्र हल्ला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
accident

Nashik Crime १) कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार २) तरुणावर सशस्त्र हल्ला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मतभेदांचे प्रसंग टाळावे, जाणून घ्या, शनिवार, ९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0420 1

अपघातग्रस्त शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले शालेय शिक्षण मंत्री

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0425 2

महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित, एकाचा शोध सुरू. उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0395 1

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 8, 2025
INDIA GOVERMENT

टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्र सरकार सक्रिय…केल्या या उपाययोजना

ऑगस्ट 8, 2025
ग्राम विकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री संयुक्त बैठक 2 1024x682 1 e1754659804441

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्र्यांचे निर्देश…

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011